अजित पवार(AJIT PAWAR)यांच्या निधनाच्या बातमीने(BARAMATI) आज संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.राजकारणापलीकडे ज्यांचे वैयक्तिक ऋणानुबंध होते, अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लोकप्रिय मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे(SANKARSHAN KARHADE) याने देखील अजितदादांसोबतचा एक फोटो शेअर करत आपली श्रद्धांजली वाहिली आहे.
संकर्षणने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अजित पवार(AJIT PAWAR) सरांचे जाणं अत्यंत दुर्दैवी आहे. काही माणसं कोणत्या पदावर आहेत यापेक्षा ती महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत, हे पाहूनच एक प्रकारचा आधार वाटायचा. आज त्यांच्या जाण्याने घरातलं कुणीतरी आपल्याला सोडून गेल्यासारखं वाटतंय.”
पत्रकार परिषदांमधील त्यांची मिश्किल शैली आणि कार्यकर्त्यांशी असलेलं नातं आठवून संकर्षण यांनी लिहिलंय “त्यांच्या पंखाखाली असलेले अनेक कार्यकर्ते आज पोरके झाले आहेत. अश्या शब्दांत त्याने आपला शोक व्यक्त केला असून, अपघातातील इतर मृतांनाही त्याने श्रद्धांजली वाहिली आहे.
