आमिर खानच्या बॅटिंगवर रवी शास्त्रीने दिला सल्ला, त्यावर आमिर म्हणाला…

268 0

मुंबई- काही दिवसांपूर्वी आमिरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये आमिरनं कोणत्याही एका आयपीएल टीमकडून क्रिकेट खेळण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली होती. त्यावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गमतीदार उत्तर दिले. मग आमिरने देखील झकास फुटवर्क करत मजेशीर अंदाजात उत्तरही दिलं आहे.

टार स्पोर्ट्स या वाहिनीनं त्यांच्या सोशल मीडियावर आमिरच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देणारा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये आमिर खान हातात क्रिकेटची बॅट घेऊन नेटप्रॅक्टिस करताना दिसतोय. त्यानंतर स्टार स्पोर्ट्सचा सूत्रसंचालक माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांना विचारतो की, येणाऱ्या आयपीएलमध्ये आमिरला संधी मिळेल का?

रवी शास्त्री म्हणतात” अर्थात त्याला कोणत्याही संघात नक्कीच संधी मिळू शकते. परंतु त्याआधी त्याला काही काळ फुटवर्क करण्याची जास्त गरज आहे”

रवी शास्त्रींच्या उत्तरावर आमिर खान कसा गप्प बसेल ? त्याने देखील ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत शास्त्री यांना उत्तर दिले, ” ‘रवी तुला माझं फुटवर्क आवडलं नाही हे ऐकून मी थोडासा निराश झालो आहे. मला असं वाटतं की तू माझा ‘लगान’ सिनेमा पाहिलेला नाही. आता मला पुन्हा एकदा बघा… मला असं वाटतं मी ज्या टीमममध्ये असेन ती टीम नक्कीच लकी असेल. चांगल्या ठिकाणी माझी शिफारस कर” त्यानंतर आमिरखान यांनी फुटवर्क करून रवी शास्त्री यांना म्हटले की, हे पाहा माझे फुटवर्क.

Share This News
error: Content is protected !!