आलिया-रणबीरच्या लग्नात असणार 28 पाहुणे आणि 200 बाऊन्सर्स

531 0

सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लव्ह बर्ड्सच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे. चाहतेही या जोडप्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जरी या दोघांकडून लग्नाच्या तारखांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. पण रणबीर आणि आलिया १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या घरात त्याची तयारी जोरात सुरू आहे.

पाहुण्यांच्या यादीपासून ते मेन्यूपर्यंत, लोक या बहुप्रतिक्षीत लग्नाचे तपशील जाणून घेण्यासाठी सगळेचजण आतुर आहेत. अलीकडेच आलियाचा भाऊ राहुल भट्टने लग्नाशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या आहेत. राहुलने सांगितले की लग्नात एकूण 28 पाहुणे येणार असून ज्यामध्ये बहुतेक कुटुंबातील सदस्य आणि त्यांचे खास मित्र असतील. यासोबतच आलियाच्या भावाने असेही सांगितले की, लग्न चेंबूर येथील आरके स्टुडिओमध्ये होणार आहे. जिथे रणबीरचे आई-वडील नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांचा विवाहसोहळा पार पडला होता. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न चार दिवस चालणार आहे

सुरक्षा म्हणून बाउन्सर असतील

राहुल भट्ट म्हणाले, ‘युसूफ भाईने आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची सुरक्षा घेतली आहे. त्यांच्याकडे मुंबईतील सर्वोत्तम सुरक्षा दल आहे – 9/11 एजन्सी. त्यासाठी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या एजन्सीमधून सुमारे 200 बाऊन्सर बोलावण्यात आले आहेत. माझ्या टीममधून 10 मुलांनाही पाठवले जाईल.
चेंबूर आणि आरके स्टुडिओ या दोन्ही ठिकाणी रक्षक तैनात केले जातील. सुरक्षेसाठी ड्रोनचीही व्यवस्था करण्यात आल्याचे राहुल यांनी सांगितले. याशिवाय प्रत्येक पाहुण्यासोबत रोइंग पेट्रोलिंग अधिकारी ठेवण्यात येणार आहेत. सुरक्षेबाबत पुरेसे नियोजन करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, ‘मी सुरक्षेचीही काळजी घेईन आणि भावाचे कर्तव्य पार पाडीन.’

Share This News
error: Content is protected !!