रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गुरुवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास मीडियासमोर येणार आहेत. लग्नाची वेळ दुपारी 2 वाजताची आहे. आलिया आणि रणबीर सध्या त्यांच्या लग्नसोहळ्यात व्यस्त आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ते दिसलेच नव्हते. आता लग्नानंतर संध्याकाळी 7 वाजता आलिया आणि रणबीर प्रसारमाध्यमांसमोर येतील. . रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नात काय घालणार या प्रश्नाचं उत्तर काही प्रमाणात सापडलं आहे. रणबीर आणि आलिया व्हाइट आणि गोल्डन कलरच्या पोशाखात असतील.लग्नात दोघेही सब्यसाचीने डिझाइन केलेले कपडे घालणार आहेत.
वधू-वर पांढऱ्या आणि सोनेरी रंगाचे पोशाख घालणार आहे असे सब्यसाचीने संकेत दिले आहेत.आलिया आणि रणबीरचे लग्न अतिशय खाजगी सोहळ्यात पार पडणार आहे. दुपारी 2 च्या सुमारास दोघं लग्नबंधनात अडकतील. वांद्रे येथील रणबीरच्या घरी ‘वास्तू’मध्ये सकाळी हळदीचा सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला ५० पाहुणे येणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्यामध्ये रणबीर-आलियाचे जवळचे मित्र असतील. हा कार्यक्रम खास बनवण्यासाठी दिल्लीहून शेफ बोलावण्यात आले आहेत. लग्नाच्या मेन्यूमध्ये खास करून चिकन डिश, मटण, दाल मखनी, पनीर टिक्का आणि तंदुरी डिश दिल्या जातील.