प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हटलं जातं.अशा अनेक सेलिब्रिटी जोड्या आहेत, ज्यांच्या वयामध्ये कमालीचं अंतर आहे. त्यामुळेच रणबीर- आलियाच्या वयात नेमकं किती अंतर असेल हा एकच प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला आहे. आलिया ११ वर्षांची असताना तिची रणबीरसोबत पहिली भेट झाली होती. त्याचवेळी तिला रणबीर आवडला होता. त्यावेळी रणबीरच्या खांद्यावर डोकं ठेवावं असंही तिला वाटलं होतं. पण, ती लाजाळू असल्यामुळे तिला ते शक्य झालं नाही.
मुळात, या दोघांकडे पाहिल्यावर त्यांच्यात काही अंतर असेल असं वाटत नाही. मात्र, या जोडीत बरंच अंतर आहे. गेल्या काही वर्षांपासून ही जोडी एकमेकांना डेट करत होती. त्यामुळे ही जोडी लग्नगाठ कधी बांधणार हा एकच प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चाहत्यांना मिळाली आहेत. काल आलियाचा मेहंदी सोहळा मोठ्या थाटात पार पडला. आज लग्नसोहळा पार पडणार आहे.
डेस्टिनेशन वेडिंगचं आयोजन न करता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या प्रेमी युगुलानं मुंबईतच त्यांच्या लग्नसोहळ्याचा बेत आखला. ठरल्याप्रमाणं तयारी केली गेली, मेहंदीसोहळा पार पडला, हळदीसाठी पाहुणेही आले. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीरची वरात निघणार नसल्याचं चित्र आता दिसत आहे. अद्यापही स्थानिक पाली हिल पोलीस यंत्रणा किंवा तत्सम कोणत्याही यंत्रणेकडे अशा संदर्भातील परवानगीचं पत्रक आलेलं नाही.
रणबीरनं फक्त त्याच्या इमारतीनजीकच सुरक्षेवर भर देण्याची मागणी पोलीस आणि संरक्षकांना दिली होती. परिणामी त्याची वरात निघणार नसल्याचं आता स्पष्ट होत आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाबद्दल जर कोणाला सर्वात जास्त उत्सुकता असेल तर ती नीतू कपूर आहे. नीतू कपूरचा डान्स रिहर्सल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि रणबीर कपूरच्या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. नीतू कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिचा मुलगा रणबीर कपूरच्या ‘ये जवानी है दिवानी’ मधील प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये नीतू कपूरसोबत एक कोरिओग्राफरही दिसत आहे. हा कोरिओग्राफर दुसरा तिसरा कोणी नसून डान्स मास्टर राजेंद्र सिंग आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, कपूर घराण्यात जेव्हा जेव्हा एखादा कार्यक्रम असतो तेव्हा सगळ्यांना डान्स कोरिओग्राफर राजेंद्र सिंहच असतात.
नीतू कपूरचा डान्स कोरिओग्राफर राजेंद्र सिंह यांच्याबरोबरचा डान्स पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा