अभिनेता अक्षयकुमार याने शेअर केला पंतप्रधानांचा ‘तो’ व्हिडिओ

531 0

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. जर्मनीत बर्लिन इथून त्यांनी एका मुलाबरोबरचा व्हिडिओ शेअर केला होता. हा छोटा मुलगा पंतप्रधानांना देशभक्तीचं गाणं ऐकवत आहे. हाच विडिओ अभिनेता अक्षयकुमार याने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर केला आहे. 

या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘हे जन्मभूमी भारत’ गाणं म्हणून दाखवताना दिसतोय. त्या मुलाच्या खांद्यावर पंतप्रधानांनी हात ठेवला आहे. हे गाणे ऐकताना पंतप्रधान देखील तल्लीन झालेले पाहायला मिळतंय. त्यांनी चुटक्या वाजवून मुलाच्या गाण्याला ताल दिलेला पाह्यला मिळत आहे.
मोदींनी त्याचं कौतुक करून त्याला आशीर्वादही दिला. बघता बघता सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. आता अक्षय कुमारनंही तो व्हिडिओ शेअर केला.

अक्षय कुमारनं मुलाचं खूप कौतुक केलं आहे. अक्षयला पंतप्रधान मोदींचा प्रतिसादही आवडला. त्यानं लिहिलं, ‘मुलाचं देशप्रेम पाहून मन खूश झालं. आनंदित झालं. नरेंद्र मोदीजी तुम्ही या मुलाला त्याच्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण दिला’

Share This News
error: Content is protected !!