नवनीत राणा यांची खासदारकी रद्द करा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित घुलेंची मागणी

539 0

पुणे- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची खासदारकी रद्द करा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवले आहे.

या पत्रामध्ये अजित घुले यांनी म्हटलंय की, नवणीत कौर राणा यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे आपण ‘मोची’ असल्याचे दाखवून मुंबई उपनगरच्या उपजिल्हाधिकारी यांच्याकडून अनुसूचित जातीचा दाखला मिळवला आणि मुंबई उपनगर जिल्हा जात प्रमाणपत्र वैधता समितीने ३ नोव्हेंबर २०१७ रोजी ते प्रमाणपत्र अवैध ठरवले, त्यानंतर खंडपीठाने त्यांना २ लाख रुपये दंड भरण्याचे आदेश देखील दिले होते.

अनेक वर्ष अन्याय व अत्याचार सहन करून मोठ्या कष्टाने आपल्या पूर्वजांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय.. स्वातंत्र्य समरात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलीये.. घटनाकारांनी कित्येक रात्री जागून काढत देशाला आदर्श संविधान दिलं.. देशाच्या लोकशाहीचे मंदिर म्हणून आपण संसदेकडे बघतो.. त्या ऐतिहासिक महत्व असलेल्या इमारतीमध्ये नवनीत राणा यांच्यासारख्या व्यक्ती बसणे हा आपल्या क्रांतिकारकांचा आणि देशाच्या लोकशाहीचा अपमान आहे.
भारताचा एक सुजाण नागरिक म्हणून मी हे आपल्या निदर्शनास आणून देत आहे.

तसेच राणा दाम्पत्याला माननीय न्यायालयाने जामीन देतांना काही अटी व शर्ती घालून दिल्या होत्या परंतु त्या अटींचे रवी राणा आणि नवनीत राणा यांनी उल्लंघन केले आहे. हा एक प्रकारे माननीय न्यायालयाच्या आदेशाच्या अपमानच आहे असे देखील अजित घुले यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. देशाच्या युवा पिढी समोर एक आदर्श उभा करण्यासाठी तसेच भारतीय लोकशाहीचे महत्व, इतिहास आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण नवनीत राणा यांचे लोकसभेतील सदस्यपद रद्द करण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत अशी मागणी राष्ट्रपतींना केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!