11 लाखांच्या पैठणीवर आदेश बांदेकरांनी दिलं स्पष्टीकरण ! म्हणाले…

213 0

महामिनिस्टरच्या नव्या ‘शो’मध्ये वहिनींना आदेश बांदेकर तब्बल 11 लाखांची पैठणी देणार आहेत. 11 लाखांच्या पैठणीची घोषणा करताच सोशल मीडियावर काही जणांनी विरोध दर्शवला. एवढी मोठी रक्कम असलेली पैठणी देण्यापेक्षा आदेश भाऊजींनी त्या कुटुंबाला पैशाची मदत करावी, अशा प्रतिक्रिया काही जणांनी दिल्या. शो सुरू होण्याआधीच नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरूवात केली होतं. मात्र या विरोधावर आदेश बांदेकर यांनी 11 लाखांच्या पैठणी देण्याबाबतचं कारण स्पष्ट केलं आहे.

आदेश बांदेकर यांनी म्हटलं आहे, महाराष्ट्रातल्या माऊली रोज घरा घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. त्यांना एक दिवस आनंदाचा मिळाला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक क्षण हा त्यांच्या स्मरणात राहील अशा पद्धतीने आनंद देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. 5500 घरांमध्ये होममिनिस्टर जाऊन पोहोचले आहे. 2004 च्या दरम्यान जेव्हा होम मिनिस्टर हा कार्यक्रम सुरू झाला. त्याआधी सगळे विणकर कर्जबाजारी झाल्याने हे आपापले यंत्रमाग विकून नुकसान झाल्यामुळे गाव सोडत होते. ज्या क्षणी होम मिनिस्टर सुरु झालं, त्यानंतर प्रत्येक दिवसाला एक पैठणी विकली जायची.

कालांतराने दिवसाला शंभर पैठणी साडीची विक्री सुरु झाली. त्यातून असंख्य विणकारांच्या हाताला काम मिळालं, असे त्या ठिकाणी असलेले विणकर म्हणाले. या 11 लाखांच्या पैठणीला बघायला गेलो तेव्हा मी थक्क झालो होतो. कारण ही पैठणी ज्यांच्या हातातून विणली जाते त्या विणकर कुटुंबातील दाम्पत्याला नीट बोलता येत नाही. त्यांना ऐकूही येत नाही. अशा विणकरांना जी मजुरी मिळणार आहे, ती त्यांच्या कुटुंबाला मिळणार आहे याचा आनंद जास्त मोठा आहे.

पैठणी कशी तयार होते हे बघायला जेव्हा आम्ही येवल्याला गेलो तेव्हा आम्ही थक्क झालो, शब्द नव्हते आमच्या डोळ्यात फक्त पाणी होतं आणि जे विणकर ती पैठणी विणत होते त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. असं स्पष्टीकरण ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याना आदेश बांदेकर यांनी दिलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!