जय दुधानेच्या ‘गडद’ चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता; बघायला मिळणार जय आणि नेहा महाजनची केमेस्ट्री

414 0

बिग बॉस शोच्या माध्यमातून स्पर्धक जय दुधानेने चांगलीच प्रसिद्धी मिळवली. त्याच्या खेळण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत आला. बिग बॉस संपल्यानंतर ‘शो’मध्येच स्पर्धकांना अनेक ऑफर मिळाल्या. त्यामध्ये जय दुधानेला सुद्धा चित्रपटाची ऑफर शो दरम्यान मिळाली. जय हा ‘गडद’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात नेहा महाजन त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

जय आणि नेहाचे काही फोटोज् सोशल मीडियावर वायरल झाले होते. सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं होत. हे फोटो मालदीवमधील असल्याचे स्पष्ट झाले मात्र, ‘गडद’ या चित्रपटाचे चित्रीकरण मालदीवमधील सुरू आहे आणि त्यावेळेसचे हे फोटो आहेत. जय दुधानेच्या या चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. वराह सिंग यांनी ‘गडद’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रज्ञेश कदम आहेत.

Share This News
error: Content is protected !!