धक्कादायक! पोस्टमार्टम केलेला व्यक्ती अंत्यसंस्कारासाठी नेताना झाला जिवंत

धक्कादायक! पोस्टमार्टम केलेला व्यक्ती अंत्यसंस्कारासाठी नेताना झाला जिवंत; अजब घटनेने राज्यभरात खळबळ

421 0

मृत घोषित करून पोस्टमार्टम केलेला व्यक्ती पुन्हा जिवंत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना राजस्थान मधील झुंझुनूमध्ये घडली. या घटनेने आता एकच खळबळ उडाली असून निष्काळजीपणा करणाऱ्या तीन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, रोहितांश असं या व्यक्तीचं नाव असून तो अपंग आणि दिव्यांग आहे. रोहितांश झुंझुनू येथील बगाडमधील मां सेवा संस्थानमध्ये राहतो. गुरुवारी सकाळी त्याची प्रकृती खालावल्याने बेशुद्ध अवस्थेत त्याला बीडीके शासकीय रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं व त्याचा मृतदेह शवागृहात हलवण्यात आला.

दोन तासांनंतर त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून संबंधित संस्थेच्या ताब्यात देण्यात आला. मात्र अंत्यसंस्कारासाठी जात असतानात मृत रोहितांश जिवंत झाला. त्याच्या शरीराची हालचाल होऊ लागली. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं.

डॉक्टर निलंबित

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार व बगाड पोलीस ठाण्याचे अधिकारी तपासासाठी रुग्णालयात आले. त्यावेळी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे फिरवलेले फिरवल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळेच जिल्हाधिकारी रामवतार मीणा यांनी हा निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार असल्याचे सांगत संपूर्ण अहवाल आरोग्य विभागाला पाठवला. त्याचबरोबर या प्रकरणात निष्काळशीपणा केल्यामुळे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाचर, डॉ. योगेश जाखर आणि डॉ. नवनीत मील यांना निलंबित करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!