युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय मायदेशी सुखरूप परतले

68 0

नवी दिल्ली- रशिया युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. अशा युद्ध परिस्थितीमध्ये युक्रेनमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकलेले आहेत. त्यामुळे या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय त्यांच्या देशात परतले आहेत. यापैकी बहुतेक जण युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत.

युक्रेनमधून भारतात परतलेल्या एका विद्यार्थ्याने दिल्ली विमानतळावर सांगितले की, “काल रात्री आम्हाला युक्रेनमध्ये 30 दिवसांच्या आपत्कालीन परिस्थितीची बातमी मिळाली आणि त्यानंतर आम्ही घरी परतलो. तर एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, “मी जिथे राहत होतो, तिथे परिस्थिती ठीक आहे. कारण हे ठिकाण सीमेपासून खूप दूर आहे. पण आमच्या दूतावासाने आम्हाला मायदेशी परतण्यास सांगितले, अ‍ॅडव्हायझरी दिल्यानंतर मी परत आलो.” युक्रेनमधून परतलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे फोटो समोर आले आहेत. विद्यार्थ्यांना पाहून त्यांचे पालक भावूक झाल्याचे दिसले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

युक्रेनवरील हल्ल्यावर भारताची प्रतिक्रिया

रशियाने क्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने पुन्हा एकदा रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांनी चर्चेतून समस्येवर तोडगा काढावा, असेही सांगण्यात आले. भारताने बदललेल्या घडामोडींना संपूर्ण प्रदेशातील शांतता आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे.

 

 

 

Share This News

Related Post

ट्विटर खरेदी करण्यापेक्षा….; आदर पूनावाला यांचा इलॉन मस्क यांना सल्ला

Posted by - May 8, 2022 0
इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्याची जगभरात चर्चा आहे. काही या डीलला महाग म्हणत आहेत तर काही अनावश्यक म्हणत आहेत.…

सांगलीत संभाजी भिडे यांचा अपघात; सायकलवरून पडल्यानं गंभीर जखमी

Posted by - April 27, 2022 0
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे  यांचा सांगलीमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी भिडे गुरुजी सायकलवरून पडले आहेत. सायकल चालवत…
Rahul Narvekar

Maharashtra Politics : न्यायालयाच्या नोटीसवर राहुल नार्वेकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - July 14, 2023 0
मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या…
Arrest

Breaking News ! पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देऊन खंडणी मागणारा गजाआड

Posted by - April 7, 2023 0
राजकीय नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी गजाआड केले आहे. भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे महाराष्ट्र…

‘या’ कारणाने वेदांता प्रकल्प पुन्हा येऊ शकतो महाराष्ट्रात ; आमदार रोहित पवार यांची स्थिर भूमिका ; वाचा काय म्हणाले रोहित पवार…

Posted by - September 21, 2022 0
अहमदनगर : वेदांता प्रकल्प गुजरातकडे गेला. जर वेदांता प्रकल्प महाराष्ट्रामध्येच राहिला असता तर लाखो बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाला असता. पण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *