YOUTUBER JASBEER SINGH ARREST: पाकसाठी हेरगिरी करणारा आणखी एक यूट्यूबर अटकेत; पाकिस्तान सोबतचं गंभीर कनेक्शन आलं समोर

1363 0

YOUTUBER JASBEER SINGH ARREST पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी ज्योती मल्होत्रा नंतर आणखी एक आणखी एक यूट्यूबरला पंजाब पोलिसांनी अटक केली..

हा यूट्यूबर नेमका कोण आहे..? त्याला पोलिसांनी नेमकं कसं ताब्यात घेतलं? पाहुयात YOUTUBER JASBEER SINGH ARREST

YOUTUBER JASBEER SINGH ARREST IN ESPIONAGE CASE पाकसाठी हेरगिरी करणारा युट्यूबर जसबीर सिंग अटकेत
ऑपरेशन सिन्दुर नंतर भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांविरुद्ध तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत…

हरियाणातील यूट्यूबर युट्यूबर ज्योती मल्होत्रासह अनेकांना ताब्यात घेण्यात आलं..

त्यानंतर एटीएसने महाराष्ट्रात मोठी कारवाई केली होती…

भारताची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं..

ठाण्यातील कळवा येथील एक व्यक्ती फेसबुकद्वारे पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होता.

OPERATION SINDOOR नंतर आता भारताकडून सुरू असलेलं OPERATION SEED नेमकं काय ?

एटीएसच्या तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या काळात हा व्यक्ती फेसबुकद्वारे एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होता..

आणि त्याने व्हॉट्सअॅपद्वारे अनेक ठिकाणची माहिती आणि फोटो पाकिस्तानला पाठवले होते.

या 35 वर्षीय व्यक्तीला एटीएसने ताब्यात घेतलं..आरोपींसोबत ताब्यात घेतलेल्या दोघांना चौकशीनंतर सोडण्यात आलं.

परंतु गरज पडल्यास त्या दोन व्यक्तींना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे..आता या हेरगिरीनंतर पंजाबमधील युट्युबर जसबीर सिंग याला अटक केली..

जसबीर सिंग हा भारतीय नागरिक आहे.

PAHALGAMच्या पीडित कुटुंबीयांना 50 लाखांची आर्थिक मदत ; STATE CABINETचा निर्णय

तो ‘जान महल’ नावाचे युट्यूब चॅनल चालवतो…

पाकिस्तानी हस्तकांसाठी काम करणाऱ्या अनेक मूळ भारतीय व्यक्तींशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप जसबीर सिंग याच्यावर आहे…

भारतातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणारी YOUTUBER JYOTI MALHOTRA कोण आहे?

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जसबीर सिंग याचे हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेली हरियाणा येथील युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातून हकालपट्टी केलेला पाकिस्तानी नागरिक एहसान-उर-रहीम उर्फ दानिश यांच्याशी घनिष्ठ संबंध होते.

मोहाली येथील राज्य विशेष ऑपरेशन्स सेलने रूपनगर येथील माहलन गावातील रहिवासी जसबीर सिंग याच्याशी संबंधित असलेल्या एक हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे…

आता ताब्यात घेतलेल्या जसबीर सिंग याच्या चौकशीतून काय माहिती पुढे येते ते पाहणं आता महत्वाचे असणार आहे…

Share This News
error: Content is protected !!