Ladli Behna Scheme

Ladli Behna Scheme : मध्य प्रदेशच्या निवडणुकीत ‘लाडली बहना’ योजना ठरली ट्रम्प कार्ड

866 0

मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्याच्या निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. यामध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपने घवघवीत यश संपादन करत मोठी मुसंडी मारली आहे. तर तेलंगणामध्ये सत्ता मिळवण्यात काँग्रेसला यश आले आहे. या सगळ्यामध्ये मध्यप्रदेशच्या निवडणुकीने (Ladli Behna Scheme) सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होईल असा अंदाज होता. मात्र, सर्व अंदाज फोल ठरवत भाजपने या ठिकाणी एकहाती सत्ता मिळवली आहे. या विजयामध्ये शिवराजसिंह यांच्या सरकारनं राबवलेली लाडली बेहना योजना (Ladli Behna Scheme) भाजपसाठी ट्रम्प कार्ड ठरली आहे. चला तर मग ही योजना नेमकी काय आहे याबद्दल जाणून घेऊया…

काय आहे लाडली बेहना योजना ?
लाडली बेहना योजना ही महिलांशी संबंधित असून त्यांना विविध प्रकारचे आर्थिक लाभ या योजनेच्या माध्यमातून देण्यात येतात. लाडली बहना योजना 5 मार्च 2023 रोजी सुरू झाली. या योजनेअंतर्गत राज्य सरकार राज्यातील प्रत्येक महिलेच्या खात्यावर 1 हजार रुपये पाठवते. या पैशातून महिलांनी आपल्या मुलांसाठी दूध, फळं आणि भाज्या खरेदी कराव्यात असा उद्देश आहे. हे पैसे अन्य कामांसाठीही वापरण्याची मुभा आहे. शिवराजसिंह सरकारनं लाडली बहना योजनेसाठी 5 वर्षांत 60 हजार कोटींची तरतूद केली आहे. मागील ऑगस्ट महिन्यात शिवराजसिंह चौहान यांनी लाडली बहना योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत टप्प्याटप्प्यानं 3 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती.

‘या’ याजोनेसाठी लागणारी पात्रता ?
मध्य प्रदेशच्या कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अर्जदार महिलेचं वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त नसावं.
लाभ घेणारी महिला शाळेत किंवा महाविद्यालयात शिकत असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळत नाही.
इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न वर्षाला अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावं.
या योजनेअंतर्गत सर्वसाधारण, मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमाती अशा सर्व प्रवर्गातील महिला अर्ज करू शकतात.

‘या’ योजनेसाठी अर्ज कसा करावा?
लाडली बहना योजनेचा लाभ घेण्यासाठी 5 ठिकाणांहून अर्ज करता येतो. ग्रामपंचायत केंद्र, सरपंच, पंचायत सचिव, लेखपाल यांच्या माध्यमातून किंवा विशेष शिबिराच्या कार्यालयातून तुम्ही अर्ज करू शकता.

‘या’ योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडं आधार कार्ड असणं अनिवार्य आहे. त्याशिवाय, छायाचित्र, बँक खात्याचे तपशील, स्वत:चा मोबाइल क्रमांक, मूळ रहिवासी प्रमाणपत्र आणि अर्ज करणाऱ्या महिलेचा जन्म दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

मध्यप्रदेश, राजस्थानात काँटे की टक्कर; कल हाती यायला सुरुवात

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Telangana Election Result : महाराष्ट्र जिंकायला निघालेल्या ‘राव’ यांच्यावर तेलंगणा गमावण्याची वेळ?

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Congress : काँग्रेसच्या पराभवाला ‘या’ चुका ठरल्या कारणीभूत; 1980 नंतर उत्तर भारतात सत्ता मिळवण्यात पहिल्यांदाच अपयश

तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी-धीरज घाटे

Share This News
error: Content is protected !!