VIJAY RUPANI LUCKY NUMBER: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचं विमान टेकऑफनंतर कोसळलं,
यामध्ये 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला.
पण या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एक गूढ गोष्ट समोर आलीय… 1206 हा आकडा – जो विजय रुपाणी यांच्या आयुष्यात ‘भाग्यवान’ मानला जायचा ..–
तोच आकडा त्यांच्या मृत्यूची तारीख ठरला.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला.
यामध्ये एकूण 265 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
यापैकी 241 प्रवासी विमानात होते, तर अपघातग्रस्त परिसरातील 24 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या भीषण अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाला आहे.
मात्र त्यांच्या मृत्यदिनाचे त्यांच्या लकी नंबरसोबतचे गूढ रहस्य समोर आलं.
अहमदाबाद अपघात दुर्घटनेमध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
विजय रूपाणी हे त्यांची पत्नी अंजली रुपानी यांना घेण्यासाठी लंडनला निघाले होते. रुपानी यांचा सीट नंबर 2D असा होता…
दरम्यान विजय रुपाणी यांचा मृत्यू, त्यांची विमानातील जागा याचा संबंध त्यांच्या भाग्यवान संख्येशी लावला जातोय.
VIJAY RUPANI: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी लंडनला का निघाले होते? कारण आलं समोर
विजय रुपानी यांचा 1206 हा त्यांचा लकी क्रमांक मानला होता… पण याच नंबरच्या तारखेला मृत्यूने देखील विजय रुपाणी यांना गाठले.
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासाठी 1206 हा फक्त एक आकडा नव्हता तर तो नशिब चमकवणारा आकडा होता.
त्यांना या नंबरवर एवढा विश्वास होता की, त्यांच्या संबंधित अनेक नंबरमध्ये 1206 या नंबरचा समावेश होता.
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या पहिल्या स्कूटीचा नंबर देखील हाच लकी नंबर होता.
VIJAY RUPANI DEATH: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मालकीच्या सर्व गाड्यांच्या 1206 हीच नंबरप्लेट होती.
त्यांच्या मित्रांच्या मते, हा आकडा त्यांच्यासाठी नेहमीच भाग्यवान राहिला होता.
पण कदाचित दैवावर कोणाचेही नियंत्रण नसते आणि 12/06 अर्थात 12 जून रोजी झालेल्या भीषण विमान अपघातामध्ये विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला.
आयुष्यभर विजय रुपानींसाठी भाग्यवान ठरलेला 1206 हा आकडा त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस बनला.