US China Trade Conflict 2025: अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या काही वस्तूंवर 100% आयात शुल्क लावले (US China Trade Conflict 2025) असून, या निर्णयामुळे त्या वस्तू अमेरिकेत आणण्यासाठी दुपटीने जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. याचा थेट परिणाम म्हणजे त्या वस्तू अमेरिकन बाजारात खूप महाग होणार आहेत. या निर्णयाचा चीनने तीव्र निषेध करत त्यावर उत्तर दिलं आहे. चीनने आता काही महत्वाच्या वस्तूंवर निर्यात बंदी घातली आहे, ज्यामध्ये दुर्बल खनिजे, लिथियम बॅटऱ्यांपासून तयार होणारे घटक आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणा व तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. चीनचा असा आरोप आहे की काही देश या कच्च्या मालाचा वापर लष्करी उद्दिष्टांसाठी करत आहेत आणि ते रोखण्यासाठी ही बंदी आवश्यक होती. चीनने या कारवाईचं समर्थन करत म्हटलं आहे की जगात शांतता टिकवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं आहे.
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या निवेदनात अमेरिकेवर आरोप केला की, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाखाली अमेरिका चीनविरुद्ध सेमीकंडक्टर आणि चिप (US China Trade Conflict 2025) उत्पादन क्षेत्रात अन्यायकारक निर्बंध लावत आहे. चीन म्हणतो की हा अतिरेक असून, यामागे व्यापारिक द्वेष आहे. त्यांनी अमेरिकेला इशाराही दिला की जर त्यांनी अजूनही चीनच्या उत्पादनांवर असेच जास्त आयात शुल्क लादले, तर त्याविरोधात चीनकडून अधिक ठोस कारवाई केली जाईल. त्यांनी हेही स्पष्ट केलं की चीन अशा धमक्यांना घाबरत नाही आणि व्यापाराच्या मुद्द्यावर युद्धाचे धोरण स्वीकारणार नाही.
CYBER CRIME PUNE NEWS:सायबर चोरट्यांचा गुंतवणुकीच्या आमिषाचा सापळा — 48 लाखांचा गंडा
या सगळ्या घडामोडींचा परिणाम थेट सामान्य नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत आणि इतर देशांमध्ये चीनमधून येणाऱ्या वस्तूंमुळे मोबाइल, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, (US China Trade Conflict 2025) बॅटऱ्या, गाड्यांमध्ये वापरली जाणारी तंत्रज्ञानं यांची किंमत वाढू शकते. कारण या वस्तूंमध्ये चीनमधील कच्च्या मालाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. जेव्हा उत्पादन खर्च वाढतो, तेव्हा तीच महागाई सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारातील हे वाद शेवटी आपल्या रोजच्या जीवनावरही परिणाम करू शकतात.