आपला महाराष्ट्रठळक बातम्याराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

Breaking News ! दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली- ओबीसी आरक्षणावर आज अंतिम सुनावणीच्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक दोन आठवड्यात जाहीर करा असे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनी नकार दिला होता. राज्य विधिमंडळात यासंदर्भातील कायदाही मंजूर करण्यात आला होता. मात्र, आता न्यायालयाने पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांना या निर्णयाचा मोठा झटका बसला आहे आता महाविकास आघाडी सरकार काय पाऊल उचलणार, हे पाहावे लागेल.