क्राईमराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

Shocking Incident in Bandra: अमेरिकेत पीएचडी करणाऱ्या रिसर्च स्कॉलरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; पीडितेला न्याय मिळण्याची अपेक्षा

Shocking Incident in Bandra: देशात महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटना चिंताजनक असतानाच, मुंबईतील वांद्रे परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Shocking Incident in Bandra) अमेरिकेतील इलिनॉईस युनिव्हर्सिटी, अर्बाना-शॅम्पेन येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या एका २९ वर्षीय रिसर्च स्कॉलरवर, त्याच युनिव्हर्सिटीतील एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. ही घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. पीडित महिला माहीमची रहिवासी असून, आरोपी तरुण लोअर परळचा आहे. एका कॉमन फ्रेंडमुळे त्यांची ओळख झाली होती आणि शिक्षणादरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली. मुंबईत परतल्यावर आरोपीने पीडितेला ‘अभ्यासाच्या’ निमित्ताने वांद्रे येथील एका आलिशान हॉटेलमध्ये बोलावले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Toxic Cough Syrup Deaths India: विषारी कफ सिरपमुळे आणखी एका चिमुकलीचा मृत्यू; मृतांची संख्या 26 वर, WHO चा तातडीचा इशारा

या घटनेनंतर आरोपीने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन १ जानेवारी ते १२ जून २०२५ या काळात पीडितेवर वारंवार अत्याचार केला. पीडित तरुणीने या नात्यावर विश्वास ठेवून ही परिस्थिती सहन केली. मात्र, (Shocking Incident in Bandra)  काही दिवसांपूर्वी आरोपी दुसऱ्या मुलीसोबत लग्नाची तयारी करत असल्याची माहिती पीडितेला मिळाली. तिने जाब विचारला असता, आरोपीने तिला शिवीगाळ केली, मारहाण केली आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. त्याने तिला जिवंत जाळून टाकण्याची आणि तिचे खाजगी फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर लीक करण्याची धमकीही दिली.

आरोपीच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने आपल्या आईला ही आपबिती सांगितली. त्यानंतर माहीममध्ये राहणाऱ्या पीडितेने वांद्रे पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार (Shocking Incident in Bandra) दाखल केली. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तात्काळ गुन्हा (FIR) दाखल केला आहे. सध्या आरोपी अमेरिकेत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. तो भारतात परतल्यावर त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

NASHIK JAIL NEWS: नाशिकरोड कारागृहात पुन्हा गोंधळ; मोबाईल आणि अमली पदार्थ वापराचे व्हिडीओ व्हायरल, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीकडूनच असे कृत्य घडल्याने समाजातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पीडितेला न्याय मिळण्यासाठी आणि अशा गुन्ह्यांना समाजात थारा मिळू नये यासाठी पोलिसांनी या प्रकरणात कठोर आणि जलदगती कारवाई करणे आवश्यक आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे आणि आरोपीच्या अटकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.