तब्बल 500 वर्षांपासून जे स्वप्न प्रत्येक भारतीयानं पाहिलं होतं, ते काल पूर्ण झाले.अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीराम (Ram Mandir) विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत प्रभू रामांचा अभिषेक सोहळा पार पडला. आजपासून राम मंदिर दर्शनासाठी सगळ्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे. अशातच तुम्हीही अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. दहा दिवसांनी अयोध्येला जाणाऱ्या फ्लाईट्सच्या तिकीट स्वस्त होऊ शकतात. त्यानंतर अयोध्येला जाण्यासाठी विमानाची तिकीटं अगदी माफक दरात तुम्हाला मिळू शकतात. दरम्यान, सध्या अयोध्येला जाणाऱ्या विमानांची तिकीटं एकतर हाऊसफुल्ल आहेत किंवा तिकीटांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना अयोध्येला जाणं थोडं कठीण झालं आहे.
10 दिवसांनी तिकिटांच्या दरामध्ये होणार घट
तुम्ही जर आजपासून पुढच्या दहा दिवसांनंतरची विमानाची तिकीटं काढली, तर मात्र तुम्हाला आजच्या किमतीपेक्षा 70 टक्के कमी दरानं तिकीटं मिळतील. तसेच, अयोध्येला पोहोचल्यानंतर तुम्हाला विमानतळावर गर्दीचा सामना करावा लागणार नाही आणि प्रभू रामाचं दर्शन घेण्यासही उशीर होणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या अयोध्येला जाणाऱ्या सर्वच विमानांच्या तिकीटांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सध्या अयोध्येला जाणाऱ्या बहुतांश फ्लाईट्सची किंमत दहा ते 15 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. जर तुम्ही 10 दिवसांनी तिकीट बुक केलं तर तुम्हाला तेच तिकीट 3 हजार ते 4 हजार रुपयांच्या दरम्यान मिळेल. यामुळे तुमची मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Vasai Local News : सिग्नल दुरुस्तीचे काम करताना लोकलची धडक बसल्याने 3 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
Gadchiroli News : महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीपात्रात उलटली; 5 जण बेपत्ता
PM Modi : अयोध्येवरून परतताच पीएम मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा
Shrikant Sarmalkar : शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचं निधन
Congress : काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ ! ‘या’ 2 मोठ्या नेत्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी
Pune News : धक्कादायक ! वाघोली येथे शिवरकर वस्ती जवळ 2 मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
Manoj Jarange : ‘आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन…’; मनोज जरांगे यांनी केली मोठी घोषणा
IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का ! विराट कोहली इंग्लडविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांना मुकणार
Uddhav Thackeray Nashik Visit : उद्धव ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमन; काळाराम मंदिराचे घेणार दर्शन
Atal Setu : अटल सेतूवर पहिला अपघात ! 3 जण जखमी; Video आला समोर
Chandrapur News : चंद्रपूरने केला विश्वविक्रम ! 33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र
Maharashtra Weather : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता
Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली?
Ram Mandir : लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत; समोर आले ‘हे’ कारण