POLITICAL LEADER AEROPLANE ACCIDENT:आजपर्यंत कोणत्या प्रमुख व्यक्तींचा,नेत्यांचा विमान अपघातात झाला मृत्यू

POLITICAL LEADER AEROPLANE ACCIDENT:आजपर्यंत कोणत्या प्रमुख व्यक्तींचा,नेत्यांचा विमान अपघातात झाला मृत्यू

509 0

POLITICAL LEADER AEROPLANE ACCIDENT: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग 787 कोसळलं..

या विमानात 242 प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे…

या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं निधन झालं..

TOP NEWS MARATHI | POLITICAL LEADER AEROPLANE ACCIDENT:आजपर्यंत कोणत्या प्रमुख व्यक्तींचा,नेत्यांचा विमान अपघातात झाला मृत्यू
अहमदाबाद ते लंडन असा प्रवास करणार एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग 787 उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात अहमदाबादमधील मेघाणी नगर या रहिवासी भागात कोसळलं..

विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते.
अहमदाबादमधील मेघाणी नगर या रहिवासी भागात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली.

विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. टेकऑफनंतर काही मिनिटांतच हे विमान कोसळल्याची माहिती आहे.

अपघातानंतर परिसरात जोरदार स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोट दिसले.

अपघातस्थळी तात्काळ अग्निशमन दल, पोलीस, आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.

अनेक जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. एअर इंडियाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे.

GUJARAT PLANE CRASH IRFAN SHAIKH: ‘ईद साजरी करून गेला, आता कधीच परतणार नाही’;गुजरात विमान दुर्घटनेत पुण्यातील केबिन क्रू इरफान शेख याचा मृत्यू

पाहुयात आजवर कोणत्या प्रमुख व्यक्तींचं आणि राजकारण्यांचं विमान दुर्घटनेत दुःखद निधन झालं

12 जून 2025 रोजी अहमदाबाद ते लंडन असा प्रवास करणारं एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग 787 उड्डाण घेतल्यानंतर

अवघ्या 10 मिनिटात कोसळलं दुर्घटनेत विजय रूपाणी यांचं निधन झालं.

सीडीएस जनरल बिपिन रावत यांचं 8 डिसेंबर 2021 रोजी

तामिळनाडू मधील कुनूर येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला

अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा

तवांग जिल्ह्यातील हिमाली भागात हेलिकॉप्टर अपघातात 30 एप्रिल 2011 रोजी मृत्यू झाला

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचं
कुर्नूल जिल्ह्यातील रुद्रकोंडा डोंगरावर हेलिकॉप्टर दुर्घटनेत 3 सप्टेंबर 2009 रोजी निधन झालं

लोकसभेचे तत्कालीन सभापती जी.एम.सी बालयोगी यांचं
आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील कोव्वाडा लंका गावात
3 मार्च 2002 रोजी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं.

इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा ग्लायडर अपघातात दिल्ली येथे 23 जून 1980 रोजी मृत्यू झाला

AHMEDABAD PLANE PASSENGER FULL LIST: ‘त्या’ विमानात कोण-कोण ? प्रवाशांची नाव आली समोर

Share This News
error: Content is protected !!