Nepal Gen Z Protest : नेपाळमध्ये सुरू असलेल्या GENZ च्या सोशल मीडिया बंदी विरोधी आंदोलनाने रौद्ररूप धारण केले आहे. सोशल मीडियाच्या 26 प्लॅटफॉर्मवर घातलेल्या (Nepal Gen Z Protest) बंदीमुळे, देशातील तरुण एकत्र येऊन नेपाळची राजधानी असणाऱ्या काठमांडू येथे आंदोलन करत होते. हे आंदोलन खवळलेले पाहून नेपाळ सरकारने त्वरित सोशल मीडियावरील बंदी हटवली. मात्र हे आंदोलन फक्त सोशल मीडियावरील बंदीसाठी नसून नेपाळ सरकारच्या भ्रष्टाचारा विरोधात आहे. असे आंदोलक स्पष्ट करत आहेत.
या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी तरुणांनी नेपाळच्या संसद भवनवर थेट हल्ला केला. तरुणांनी संसद भवन थेट पेटवून दिले. त्याचबरोबर नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा (Nepal Gen Z Protest) ओली यांच्या घरावर हल्ला केला. त्यांचे घर पेटवून देण्यात आले. या हल्ल्याचं कारण ओलींनी तडकाफडकी दिलेला राजीनामा असल्याचं बोललं जात आहे.
तर आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी नेपाळचे माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या घरावर देखील हल्ला केला. त्यांचे घर पेटवून देण्यात आले. या हल्ल्यात घरात अडकलेल्या खनाल यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकर या अगतिक होरपळून गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांचे मंगळवारी निधन झाले, असे वृत्त माध्यमांनी दिले आहे. नेपाळची राजधानी काठमांडूच्या दल्लू भागात हा धक्कादायक प्रकार घडला. चित्रकार यांना कीर्तीपूर बर्न हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Nepal social media ban: GENZ पुढे नेपाळ सरकारचं झुकत माप; सोशल मीडियावरील हटवली बंदी
सोशल मीडियावर घालण्यात आलेल्या या बंदी च्या विरोधात केलेल्या या आंदोलनाने (Nepal Gen Z Protest) अतिशय हिंसक वळण घेतले आहे. ओली सरकारमधील अर्थमंत्री बिष्णू प्रसाद पौडेल यांना देखील काठमांडूच्या रस्त्यावर मारहाण करण्यात आली. त्याचा भयानक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओत त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करतानाचे दृश्य दिसते आहे.
Chandrapur News: मिरवणुकीतला वाद बेतला जीवावर, डीजेवरून वाद मित्रानेच घेतला जीव ; वाचा सविस्तर
हे आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार, अश्रूधूर व पाण्याचा मारा केला. या गोळीबारात 19 जण ठार झाले व अनेक जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील बंदी हटवण्यात आली. मात्र तरीही आंदोलन सुरूच आहे. या आंदोलकांनी नेपाळच्या वरिष्ठ नेत्यांची घरी आणि नेपाळची संसद पेटवली. त्याचबरोबर काठमांडूचे विमानतळ देखील बंद करण्यात आले आहे.
नेपाळमध्ये सुरु असलेल्या या आंदोलनाने घेतलेलं हिंसक वाटण घेतले. व लष्कराच्या हेलिकॉप्टरने काही मंत्र्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.