मोदींचा मास्टरप्लॅन ! लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करणार राज्यातील 38 प्रकल्प

64 0

महाराष्ट्रात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे ३८ प्रकल्प आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण केले जातील.

या प्रकल्पांची अंदाजे मूळ किंमत ६३,८०४ कोटी रुपये गृहीत धरण्यात आली होती. २० वर्षांच्या झालेल्या विलंबामुळे त्यांचा खर्च ४० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढला आहे. दोन प्रकल्पांचा खर्च तर तब्बल ५०० टक्क्यांनी वाढला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील रेल्वे, रस्ते, शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित या प्रकल्पांकडे रोज लक्ष देत असल्यामुळे आता विलंबाचे दिवस निघून गेले आहेत. वर्ष २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी हे प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य मोदी यांनी ठरवले आहे. हे लक्ष्य केवळ महाराष्ट्रापुरतेच नसून इतर राज्यांसाठीही आहे.

 

मुंबई मेट्रो लाइन-३ (कुलाबा-वांद्रे-सिप्झ)

 

अंदाजित खर्च – २३,१३६कोटी रूपये पूर्ण होईपर्यंतचा खर्च – ३३,४०६कोटी

 

सद्य:स्थिती : लॉकडाऊनमुळे मेट्रो ३ च्या खर्चात वाढ झाली असून, स्थापत्य कामांसह कर्मचारी खर्च १०८ कोटींनी वाढला आहे. कोरोनामध्ये आलेल्या अडचणीमुळे २३ मार्च २०२० ते २२ सप्टेंबर २०२० या काळातील कामांना मुदतवाढ दिली होती. या काळात स्थापत्य काम आणि मजुराच्या वेतनापोटी प्रशासनाच्या खर्चात १०७ कोटी ९१ लाख रुपयांनी वाढ झाली.

बेलापूर-सीवूड इलेक्ट्रिक डबल लाइन

४९५कोटी अंदाजित खर्च, २,९८०कोटी वाढलेली किंमत

१९९६ मध्ये या प्रकल्पाचा गृहीत धरला होता. तो आता ५०० टक्क्यांनी वाढला आहे.

कधी पूर्ण होणार? : हा प्रकल्प येत्या ३ महिन्यांत पूर्ण होईल.

सद्य:स्थिती : यंदाच्या अर्थसंकल्पात बेलापूर-सीवूड-उरण मार्गसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एमयूटीपी ३ प्रकल्पातील हा प्रकल्प पूर्ण झाल्यास रेल्वे मुंबई ते उरण थेट सेवा देता येणार आहे.

वडसा-गडचिरोली

२२९कोटी अंदाजित खर्च, १०९६कोटी वाढलेली किंमत

रेल्वे मार्ग काही ठिकाणी घनदाट जंगलातून जातो. चार किमी परिसरात वाघांचा अधिवास.

प्रकल्पाचे तपशिलीकरण, वेगवेगळ्या तांत्रिक बाबी, आर्थिक आणि प्रशासकीय निर्णयांवर अवलंबून राहावे लागणे यामुळे प्रकल्पखर्चात वाढ झाली. काही प्रकल्पांचा खर्चच कमी दाखविला गेला हाेता. तसेच कुशल मनुष्यबळ व मजुरांची टंचाई. हेही प्रकल्प दिरंगाईचे कारण ठरले. – राव इंदरजित सिंह, राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

 

रखडलेले प्रकल्प

रेल्वे : १४, मूळ किंमत – १८,५६७ कोटी, अंदाजित खर्च – ३२,९४९ कोटी

कोळसा : ५ मूळ किंमत – १,८०१ कोटी, अंदाजित खर्च – २,११३ कोटी

पेट्रोलियम : ५ मूळ किंमत – ११,२८७ कोटी, अंदाजित खर्च – १३,५२९ कोटी

शहरी विकास (मेट्रो) : १ मूळ किंमत – २३,१३६ कोटी, अंदाजित खर्च – ३३,४०६ कोटी

महामार्ग : १३ मूळ किंमत – ८,९६६ कोटी रूपये, अंदाजित खर्च – ९,८०६ कोटी

Share This News

Related Post

Breaking News

Air Ambulance : समृद्धी महामार्गावर लवकरच एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरु करणार: राज्य सरकारचा मोठा निर्णय

Posted by - July 12, 2023 0
मुंबई : समृद्धी महामार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण पाहून राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या महामार्गावर लवकरच एअर ऍम्ब्युलन्स…

धक्कादायक : हा व्हिडिओ पाहिल्यावर अंगावर काटा येईल ; स्कूलबस ड्रायव्हरला त्या प्रकारानंतर केले निलंबित

Posted by - September 27, 2022 0
शाळेत बसने किंवा व्हॅनने जाणाऱ्या लहान मुलांच्या बाबत आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अपहरण ,शारीरिक अत्याचार ,अपघात ,आग…

बिग ब्रेकिंग ! मंत्री नवाब मलिक यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Posted by - April 2, 2022 0
मुंबई- मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटकेत असलेले महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून सोमवारी…

देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर चप्पल भिरकावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

Posted by - March 7, 2022 0
पिंपरी- विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर होते. या दरम्यान फडणवीस यांच्या वाहनावर चप्पल फेकल्याची घटना घडली. या…
Rupali Chakankar

Rupali Chakankar : कविता पोस्ट करत रुपाली चाकणकर यांची सुप्रिया सुळेंवर टीका

Posted by - November 25, 2023 0
पुणे : अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी एक कविता ट्विट करत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *