Breaking News ! हरियाणामध्ये 4 संशयित दहशतवाद्यांना अटक, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

216 0

कर्नाल- हरियाणातील कर्नाल येथून चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. चौघांकडून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. त्याच्याकडे आरडीएक्स असल्याचा पोलिसांना संशय असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

या संपूर्ण प्रकरणाच्या तपासादरम्यान बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले दहशतवादी काही मोठी घटना घडवण्यासाठी निघाले असल्याची भीती वर्तवली जात आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस आणि प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

Share This News
error: Content is protected !!