Pulwama News

Pulwama News : पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार

1226 0

पुलवामा : जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर (Pulwama News) आली आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात गुरुवारी सकाळपासून चकमक सुरू आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा या ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस आणि सुरक्षा दलाने एकत्र येऊन ही कारवाई केली. या चकमकीत 1 दहशतवादी ठार झाला असून सध्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.

पुलवामामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. सुरक्षा दलांना दोन दहशतवाद्यांनी घेरल्याचा संशय आहे. त्यापैकी एक चकमकीत ठार झाला आहे. दुसऱ्या दहशतवाद्याला शोधण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. दोन्ही दहशतवादी मोठा कट रचत असल्याचा संशय आहे. आज सकाळच्या सुमारास सुरक्षा दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Haryana Accident : बस उलटून झालेल्या अपघातात 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News
error: Content is protected !!