N Valarmathi Pass Away

N Valarmathi Pass Away : चांद्रयान-3 ला काउंटडाऊन देणारा आवाज हरपला ! शास्त्रज्ञ एन. वलरमथी यांचे निधन

21603 0

भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञ एन. वलरमथी (N Valarmathi Pass Away) यांचे निधन झाले आहे. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. चांद्रयान 3 रॉकेट प्रक्षेपणाच्यावेळी काउंटडाउन करताना वलरमथी यांनी आवाज दिला होता. त्या 64 वर्षांच्या होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने इस्रोचे मोठे नुकसान झाले आहे.

इस्रोचे शास्त्रज्ञ एन. वलरमथी या तामिळनाडूतील अरियालूरचे रहिवासी होत्या. राजधानी चेन्नईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 14 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-3 लाँच करण्यात आले होते. चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणादरम्यान, एन. वलरमथी यांनी काउंटडाउनसाठी त्यांचा आवाज दिला. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ डॉ पीव्ही व्यंकटकृष्ण यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या उत्तर ध्रुवावर उतरलेले चांद्रयान 14 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले होते. यशस्वी चांद्रयान 3 मोहीम त्यांचे अंतिम काउंटडाउन ठरले.

वलरमथी यांचा जन्म 31 जुलै 1959 रोजी झाला होता. वयाच्या 25 व्या वर्षीच त्या इस्रोमध्ये सामील झाल्या. त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये भाग घेतला होता. वलरमथी यांनी RISAT-1 या पहिल्या स्वदेशी-विकसित रडार इमेजिंग उपग्रह आणि भारताचा प्रकल्प संचालक म्हणून काम केले होते. 15 ऑगस्ट 2015 रोजी त्यांना प्रतिष्ठित अब्दुल कलाम पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!