GUJARAT PLANE CRASH IRFAN SHAIKH: गुजरातच्या अहमदाबाद मध्ये भीषण विमान दुर्घटनेत अडीचशे पेक्षा जास्त नागरिकांचा जीव गेला.
यामध्ये देशातील नागरिकांसह काही इतर देशांमधील नागरिकही होते.
मात्र या सगळ्यांमध्ये पिंपरी चिंचवडमधील इरफान शेख या केबिन क्रू म्हणून कार्यरत असलेल्या तरुणालाही आपला जीव गमवावा लागला.
इरफानच्या (IRFAN SHAIKH) जाण्यामुळे त्याच्या कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
Ahemdabad Plane Crash:पायलटचा शेवटचा मेडे कॉल… आणि काही क्षणांत काळाने गाठलं!
गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात इरफान शेख या 22 वर्षीय केबिन क्रू मेंबरचा ही दुर्दैवी अंत झाला आहे.
इरफान हा पिंपरी चिंचवडच्या संत तुकारामनगरमध्ये वास्तव्यास होता. त्याच्या कुटुंबात आजी,आजोबा, आई, वडील व भाऊ आहेत.
जिद्दीने शिक्षण घेऊन इरफान दोन वर्षांपूर्वीच एअर इंडिया मध्ये क्रू मेंबर म्हणून कामाला लागला होता.
तो या कामात प्रचंड खुश होता. त्याच्या शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इरफान हा अत्यंत मनमिळावू, हुशार आणि जिद्दी होता.
नुकत्याच झालेल्या बकरी ईद साठी तो घरी येऊन गेला होता. त्याने कुटुंबीय आणि मित्रांबरोबर अतिशय उत्साहात ईद साजरी केली.
व ईद नंतर काही दिवसातच तो पुन्हा कामासाठी गेला.
Ahemdabad Plane Crash Update : उड्डाण घेतल्यानंतर ‘त्या’ शेवटच्या काही मिनिटात काय घडलं?
दरम्यान काल झालेल्या या दुर्घटनेत विमानात असलेल्या 242 जणांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला
यामध्ये दहा केबिन ग्रुप देखील समावेश आहे. यातच इरफान याचाही मृत्यू झाला.
ही बातमी कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
AHMEDABAD PLANE PASSENGER FULL LIST: ‘त्या’ विमानात कोण-कोण ? प्रवाशांची नाव आली समोर
गुजरात विमान दुर्घटनेनं संपूर्ण देशाची हानी झाली आहे. लहान मुलं आणि तरुणांसह अडीचशे पेक्षा जास्त नागरिक यामध्ये दगावले आहेत.
दरम्यान इरफान शेख याच्या जाण्यामुळे पुणेकरांकडून दुःख व्यक्त केलं जात आहे. तर त्याचा मृतदेह लवकरात लवकर मिळावा,
अशी मागणी त्याच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.
AHMEDABAD PLANE CRASH: गुजरातच्या अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं