Gold

Gold Rate : सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ; गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत

1259 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 24 तासात सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी आणि गुंतवणुकीत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे आजचे भाव 70 हजार 100 रुपये प्रतितोळे एवढे झाले आहे. महत्त्वाच म्हणजे आज पर्यंत सोन्याच्या दराचा हा सगळ्यात उच्चांक भाव आहे.

24 तासांत दोन हजारांनी वाढलेल्या सोने खरेदीकडे लोकं पाठ फिरवणार का? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोन्याच्या दराने 70 हजारांचा आकडा पार केल्यानंतर खरेदी करण्याचा कल कमी होताना पाहायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर अमेरिकेतील फेडरल बँकांनी व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्यामध्ये करण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहण्यात येत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!