Donald Trump's Announcement: 100% Tariff on Patented Medicines from October 1

Donald Trump’s announcement: 1 ऑक्टोबरपासून पेटंट औषधांवर 100% टॅरिफ

63 0

Donald Trump’s announcement: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून, पेटंट औषधांवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा (Donald Trump’s announcement) केली आहे. या निर्णयामुळे भारताच्या औषध उद्योगावर थेट परिणाम होणार आहे. चला तर पाहूया, याचा नेमका परिणाम काय होणार आहे.

BHOR DHANAVALI: पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील धनावली या दुर्गम आदिवासी पाड्यावरील एका घटनेने

भारत हा जगातील सर्वात मोठा औषध निर्मिती देश आहे. जगातील निम्म्याहून अधिक जेनेरिक औषधे भारतातून निर्यात केली जातात. यामध्ये अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या 40% जेनेरिक औषधांचा आणि युकेमधील 25% औषधांचा पुरवठा भारतातून होतो. 2025 मध्ये भारताची औषध निर्यात 30 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे, ही विक्रमी कामगिरी मानली जाते.

Mukhyamantri Solar Krushi Pump Yojana: सरकारची नवी योजना; मोफत सौर कृषी पंप मिळणार

मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन धोरणामुळे भारतीय औषध कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. झायडस लाईफ सायन्सेस, सन फार्मा, अरबिंदो फार्मा, (Donald Trump’s announcement) ग्लँड फार्मा यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे 30% ते 50% उत्पन्न अमेरिकन बाजारावर अवलंबून आहे. त्यामुळे या नव्या टॅरिफमुळे भारतीय औषध निर्यात उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

Palghar fraud case: पालघर जिल्ह्यात फसवणुकीचा मोठा प्रकार 

हा 100% कर 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे. जर कोणत्याही (Donald Trump’s announcement) भारतीय औषध कंपनीने अमेरिकेत आपला उत्पादन प्रकल्प सुरू केला, तर त्या कंपनीला या टॅरिफमधून सूट दिली जाईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच, कंपन्यांना अमेरिकेतच उत्पादन केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.

हा निर्णय फक्त भारतासाठीच नव्हे तर अन्य औषध निर्यात करणाऱ्या देशांसाठीही धोक्याचा इशारा आहे. भारतासमोर आता दोन पर्याय आहेत — अमेरिकेतील उत्पादन सुरू करणे किंवा नवीन निर्यात बाजारपेठांचा शोध घेणे.

Share This News
error: Content is protected !!