नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात पुन्हा एकदा कोरोना (Coronavirus) संक्रमण वाढताना दिसत आहे. यामुळे लोकांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या नव्या JN1 सब-व्हेरियंटमुळे जगासह देशातही नव्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भारतातही कोरोनाच्या नवा सब-व्हेरियंट JN1 ने हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सध्या देशात 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कोविडच्या JN1 सब-व्हेरियंटचा कहर
चीनसह जगातील अनेक देशांमध्ये कोविडचा JN1 सब-व्हेरियंट वेगाने पसरत आहे. भारतात दर तासाला सुमारे 26 ते 27 कोरोना रुग्ण आढळत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती काय?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत एकूण कोविड-19 संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 4,50,07,212 इतकी आहे. यापैकी सध्या 2,997 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. केरळमध्ये संसर्गामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 5,33,328 वर पोहोचली आहे. इतर रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Health Tips : हिवाळ्यात दररोज दही खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य?
Eknath Shinde : शिवसेनेचा वर अन् ठाकरे गटाची वधू; ठाण्यातील ‘त्या’ विवाहाची सर्वत्र चर्चा
Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला
Belgaon News : दारुड्या शब्दावर बंदी आण्यासाठी मद्यपींनी काढला थेट विधान भवनावर मोर्चा
Pune Murder : पुणे हादरलं ! संशयातून मित्रानेच केली मित्राची हत्या
Sunil Kedar : रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी; 21 वर्षांनी लागला निकाल
Latur Accident : लातूरमध्ये ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; 3 शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू