पुलवामा हल्ल्याप्रकरणी खळबळजनक गौप्यस्फोट करणाऱ्या सत्यपाल मलिकांना सीबीआयची नोटीस

1188 0

केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीमुळे 2019मध्ये पुलवामा येथे भयंकर दहशतवादी हल्ला होऊन 40 जवान शहीद झाले होते. तसेच जम्मू-कश्मीरातील जलविद्युत प्रकल्प आणि विमा योजनेत भ्रष्टाचार झाला होता, असा खळबळजनक गौप्यस्पह्ट माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीत सात दिवसांपूर्वी केला.

यानंतर आता सीबीआयकडून मलिक यांना समन्स बजावण्यात अल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. सरकारी कर्मचारी समूह वैद्यकीय विमा गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना चौकशीसाठी बोलावले आहे. तशी त्‍यांना नोटीस जारी करण्यात आली असून त्यासाठी आपण 27 ते 29 एप्रिल दरम्यान उपलब्ध असल्याचे मलिक यांनी ‘सीबीआय’ला कळविल्याची माहिती आहे.

Share This News
error: Content is protected !!