… अन् क्षणात कोसळलं ट्वीन टॉवर; पाहा व्हिडिओ

199 0

नवी दिल्ली: आज नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर पाडण्यात आले आहे. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले होते. हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत होती.

कोणतीही इमारत पाडण्यासाठी सुरक्षेची आवश्यकता, वेळेची उपलब्धता आणि इमारतीची टिकण्याची क्षमता या तीन निकषांच्या आधारे पाडण्याची पद्धत निवडली जाते, असं हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मेहता म्हणाले. “या प्रोजेक्टची माहिती मिळाल्यावर साइटला भेट दिली, त्यानंतर हे टॉवर्स पाडण्यासाठी इम्प्लोजन प्रक्रिया सर्वात योग्य असेल, असं आमच्या लक्षात आलं. यासाठी डायमंड कटिंगची आणखी एक टेक्नॉलॉजी वापरता आली असती, परंतु त्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला असता. कारण त्या प्रक्रियेत क्रेन वापरून प्रत्येक पिलर, भिंत आणि बीम हळूहळू नष्ट करावे लागले असते. तसंच या प्रक्रियेसाठी इम्प्लोजनपेक्षा जवळपास पाचपट जास्त खर्च आला असता,” असं मेहता यांनी सांगितलं.

 

Share This News
error: Content is protected !!