अग्निपथ योजना: भारतीय हवाई दलानं शेअर केली महत्वाची महिती

217 0

केंद्र सरकारने सशस्त्र दलात भरतीसाठी आणलेल्या ‘अग्निपथ’ या नव्या योजनेला विरोध होत असताना भारतीय हवाई दलाने या योजनेशी संबंधित माहिती शेअर केली.

वायुसेनेच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या माहितीनुसार, पगारासह अग्निवीरांना हार्डशिप भत्ता, गणवेश भत्ता, कॅन्टीन सुविधा आणि वैद्यकीय सुविधा देखील मिळतील. या सुविधा नियमित सैनिकाला मिळतात.  केंद्र आणि राज्य सरकार देणार अग्निवीरांना खास सवलत, 4 वर्षानंतर होणार अनेक फायदे अग्निवीरांना सेवा कालावधीत प्रवास भत्ताही मिळेल. याशिवाय त्यांना वर्षातून ३० दिवसांची रजा मिळणार आहे.

त्यांच्यासाठी वैद्यकीय रजेची व्यवस्था वेगळी आहे. अग्निवीरांना सीएसडी कॅन्टीनची सुविधाही मिळणार आहे. सेवेदरम्यान (चार वर्षे) दुर्दैवाने अग्निवीरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळेल. याअंतर्गत त्यांच्या कुटुंबाला सुमारे एक कोटी रुपये मिळणार आहेत.

चार वर्षांच्या सेवेनंतर 25 टक्के अग्निवीरांना नियमित केडरमध्ये घेतलं जाईल. या २५ टक्के अग्निवीरांची नियुक्ती त्यांच्या सेवा कालावधीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल. केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ स्कीमला का होतोय देशभरात विरोध? काय आहे तरुणांचं म्हणणं? इथे मिळेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वायुसेनेनुसार अग्निवीर हा सन्मान आणि पुरस्काराचा हक्कदार असेल. वायुसेनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अग्निवीरांना सन्मान आणि पुरस्कार दिले जातील. हवाई दलात भरती झाल्यानंतर अग्निवीरांना लष्कराच्या गरजेनुसार प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 

Share This News
error: Content is protected !!