Afghanistan Pakistan Border Tension: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव ९ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे अधिकच वाढला. (Afghanistan Pakistan Border Tension) अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील बाजारात झालेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये राजधानी काबूलसह खोस्त, जलालाबाद आणि पक्तिका या शहरांना निशाण्यावर ठेवण्यात आले होते. पाकिस्तानच्या या कारवाईवर अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि याला हवाई क्षेत्राच्या सीमांचे गंभीर उल्लंघन तसेच देशाच्या सार्वभौमत्वावर केलेला थेट हल्ला असल्याचे म्हटले.
अफगाणिस्तानच्या संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान वारंवार हवाई सीमांचे उल्लंघन करत असल्याने प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानच्या सैनिकांनी आक्रमक (Afghanistan Pakistan Border Tension) कारवाई केली. या कारवाईत पाकिस्तानला मोठे नुकसान सोसावे लागले. तालिबान सरकारचे मुख्य प्रवक्ते जुबिहुल्लाह मुजाहिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या २४ चौक्यांवर कब्जा केला असून, यामध्ये पाकिस्तानचे एकूण ५८ सैनिक ठार झाले आहेत, तर ३० सैनिक गंभीर जखमी झाले आहेत.
ANJALI DAMANIYA ON NILESH GHAIWAL: संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती बिहारसारखी झाली
पाकिस्तानने हे हवाई हल्ले तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेचे प्रमुख नूर वली मेहसूद याला लक्ष्य करण्यासाठी केल्याचा दावा केला आहे. मात्र, अफगाणिस्तानने पाकिस्तानला वारंवार चेतावणी दिली होती की त्यांनी अफगाण भूमीतील सार्वभौमत्वाचे उल्लंघन करू नये.
या संघर्षामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानवर दहशतवादी हल्ल्यांसाठी आपली भूमी वापरल्याचा आरोप केला आहे, तर पाकिस्तानने अफगाणिस्तानला आपल्या हद्दीत TTP ला आश्रय न देण्याचे आवाहन केले आहे. या चकमकींमुळे संपूर्ण सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थिती गंभीर बनली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची गंभीर दखल घेण्यात येत आहे.