अमेरिकन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला

2699 0

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका रॅलीवेळी गोळीबाराची घटना घडलीय. ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला सीक्रेट सर्विसच्या सुरक्षा रक्षकांनी गोळ्या झाडून ठार केलं.

या हल्ल्यामध्ये ट्रम्प जखमी झाले असून त्यांच्या कानाला गोळी लागली आहे. शनिवारी पेनसिल्व्हेनिया येथे एका प्रचार कार्यक्रमात बोलत असताना एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर सीक्रेट सर्व्हिसच्या निवेदनानुसार, शूटर मारण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!