राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे (ZILLA PARISHAD PANCHAYAT SAMITI RESULT) निकाल स्पष्ट होत असताना, अनेक दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांनी प्रभावी विजय नोंदवत लक्ष वेधून घेतले आहे. ‘मिनी विधानसभा’ मानल्या जाणाऱ्या या निवडणुकांत पुणे (PUNE), सोलापूर(SOLAPUR) , रायगड(RAIGAD) आणि रत्नागिरी (RATNAGIRI) जिल्ह्यांमध्ये राजकीय वारसांचे वर्चस्व दिसून आले आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव (AAMBEGOAN) मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांना धक्का बसला पुतणे विवेक वळसे पाटलांचा(VIVEK VALASE PATIL) पराभव . पुरंदर तालुक्यात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कन्या रूपाली झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर बाजी मारली. यासोबतच पुरंदरमधील दोन्ही पंचायत समिती जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी ठरले.
सोलापूर(SOLHAPUR) जिल्ह्यातील माढा तालुक्यात माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत (PRUTIVIRAH SAVANT) यांनी भाजपच्या तिकिटावर दणदणीत विजय मिळवला. दहिगाव, माळशिरस जि.प.मध्ये भाजप नेते राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते(SANSKRUTI SATPUTE) यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीत यशस्वी पदार्पण केले.
अक्कलकोट(AKKALKOT) तालुक्यातून आमदार सचिन कल्याणशेट्टी (SACHIN KALYANSHETTI) यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी चपळगाव गटातून विजयी झाले आहेत, तर त्यांची पत्नी शांभवी कल्याणशेट्टी ह्या चपळगाव गणातून विजयी झाल्या आहेत.
कोकणात रत्नागिरी (KOKAN RATNAGIRI) जिल्ह्यातील असगोली गटातून आमदार भास्कर जाधव (BHASKAR JADHAV) यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी आघाडी घेत विजय मिळवला. तर रायगडमध्ये आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनीही प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत विजय संपादन केला.
परभणीचे(PRABHANI) नेते तथा भाजपचे (BJP)माजी मंत्री सुरेश वरपुडकर ( SURESH VARAPUDKAR) यांच्या कुटुंबातील पाच जण या निवडणुकीमध्ये उभे होते. त्यामध्ये, 5 पैकी 4 जागेव वरपूडकर यांच्या नातेवाईकांना पराभव स्वीकारावा लागला असून केवळ एका जागेवर त्यांचा पुतण्या विजयी झाला आहे.