Breaking News

भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर अजित पवार म्हणाले आता काय स्टॅम्प पेपरवर…..

1210 0

मागील अनेक दिवसांपासून अजित पवार भाजपासोबत जात सरकार स्थापन करतील अशा चर्चा असतानाच आता स्वतः अजित पवार यांनी याबाबत खुलासा केला आहे.

मी भाजपसोबत जाणार या केवळ चर्चाच असून यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी सांगत मी राष्ट्रवादीतचं आहे हे काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का ? असं देखील अजित पवार म्हणाले.

पुढं बोलताना अजित पवार म्हणाले की मी कोणत्याही आमदाराच्या सह्या घेतल्या नसून माझ्याबद्दल गैरसमज परसवले गेले आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असून शरद पवार यांच्या मार्गदर्शनात काम करत राहणार असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं.

सामनामध्ये आलेल्या रोखठोकवर देखील अजित पवार यांनी आक्षेप घेत या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!