मुंबई महानगरपालिकेच्या(BMC) महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप(BJP) मोठी राजकीय खेळी करणार असल्याच्या चर्चांना अलीकडे उधाण आलं होतं. सूत्रांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात होती. मनसेकडून भाजपला(BJP) सभागृहात अतिरिक्त पाठबळ मिळू शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या वृत्तामुळे मुंबईच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग आला होता.
मात्र, या सर्व चर्चांना मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (RAJ THACKAREY) यांनी पूर्णविराम दिला आहे. मुंबई महापालिकेत भाजपला पाठिंबा देण्याबाबत सुरू असलेली चर्चा त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळली. “मी सांगतोय ना, नाहीये,” असे ठामपणे सांगत राज ठाकरे(RAJ THACKAREY) यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट केले.
राज ठाकरे(RAJ THAKAREY) यांच्या या भूमिकेनंतर मनसे (MNS)भाजपला समर्थन देणार असल्याच्या दाव्यांवर पडदा पडला असून, राजकीय वातावरणात निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. आता मुंबई महापालिकेतील आगामी राजकीय घडामोडी कोणत्या दिशेने वळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या स्पष्टीकरणानंतर भाजपच्या पुढील रणनीतीवर आणि मनसेच्या भूमिकेवर नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.