WHO IS PREMA PATIL: सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू मुलगी ते सहाय्यक पोलीस निरीक्षक…
आणि पोलीस दल ते थेट मिसेस इंडिया…
ही बिरूदं जिंकलेल्या प्रेमा पाटील सध्या कोथरूड प्रकरणातील मुलींना जातीवाचक
शिवीगाळ केल्याप्रकरणी चर्चेत आहेत.
जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असणाऱ्या API प्रेमा पाटील कोण ?
WHO IS PREMA PATIL: याच प्रेमा पाटील यांची स्टोरी अतिशय इंटरेस्टिंग आहे.
प्रेमा पाटील या सांगलीतील पलूस जवळील पुणदी या गावच्या आहेत.
त्यांचे वडील ‘महावितरण’मध्ये नोकरी करायचे, तर आई गृहिणी आहेत.
त्यांना दोन भाऊ देखील असून लहानपणी घरची परिस्थिती अगदी मध्यमवर्गीय होती.
घरात कमावते फक्त वडीलच असल्याने वडिलांना हातभार लावावा, असं त्यांना कायमच वाटायचं.
कराडच्या वेणुताई चव्हाण महाविद्यालयात शिक्षणासाठी दाखल झाल्यानंतर त्या शालेय विद्यार्थ्यांची शिकवणी घ्यायला लागल्या.
शिक्षण करत करत खर्च भागवण्यासाठी शिकवण्यांमधून पैसे येऊ लागले. त्याचवेळी त्यांचा कल स्पर्धा परीक्षांकडे वळला.
एकीकडे एम कॉम चं शिक्षण सुरू होतं दुसरीकडे स्पर्धा परीक्षा देणंही सुरू होतं.
विशेष म्हणजे एम कॉम आणि स्पर्धा परीक्षांचा निकाल एकाच दिवशी लागला.
सांगलीच्या लहानशा गावात जिथे बहुतांश मुलींना उच्च शिक्षणाची संधीही दिली जात नव्हती.
त्याच गावातून आलेल्या प्रेमा पाटील यांची पीएसआय पदावर नियुक्ती झाली.
2011 पासून त्या पोलीस दलात कार्यरत आहेत.
विविध पद भूषवल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांची स्पेशल क्राईम ब्रांच च्या
सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाली.
याच दरम्यान विघ्नेश पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
दरम्यान 2019 मध्ये त्यांनी फेसबुक वर मिसेस इंडिया स्पर्धेबद्दल वाचलं.
पतीला सांगितल्यानंतर त्यांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी आग्रह धरला.
पतीच्या आग्रहाखातर प्रेमा पाटील यांनी स्पर्धेत नाव नोंदवलं. इंटरव्यू झाले, ग्रुमिंग सेशन झालं.
आई आणि पोलीस ऑफिसर अशा दोन्ही जबाबदाऱ्यांतून वेळ काढून त्यांनी स्पर्धेची तयारी सुरू केली.
हाय हिल्सवर रॅम्प वॉक करणं, वेगवेगळे आउटफीट आणि लुक ट्राय करणं, असं सगळं करत स्पर्धेची तयारी पूर्ण केली.
आणि अखेर सगळ्या फेऱ्या पार करून अंतिम फेरी गाठली.
या अंतिम फेरीत आपल्या रोल मॉडेल किरण बेदी असल्याचं त्यांनी सांगितलं.
आणि अखेर रनिंग मिसेस इंडिया 2019 स्पर्धेचा किताब जिंकला.
तेव्हापासून प्रेमा पाटील प्रचंड चर्चेत राहिल्या. त्यांना मॉडलिंगच्या ऑफर येऊ लागल्या.
मात्र दुसरीकडे पोलीस दलातील कारकीर्दही सुरूच होती.
दुसरीकडे प्रेमा पाटील याआधी सुद्धा काही वादग्रस्त प्रकरणांमध्ये चर्चेत आल्या आहेत.
मात्र आता त्यांची चर्चा होते ती कोथरूड प्रकरणात त्यांचं नाव आल्याने..
संभाजीनगर च्या एका मिसिंग महिलेच्या तपासादरम्यान प्रेमा पाटील यांनी तीन मुलींना ताब्यात घेतलं.
चौकशी सुरू असताना त्यांनी मुलींना अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली.
मुलींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे प्रश्न विचारले.
अनेक तास त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवून मारहाण देखील करण्यात आली.
इतकच काय तर या मुलींनी अमानुष चौकशीला विरोध केल्याने तुमचा हाच अटीट्यूड राहिला,
तर एक दिवस तुमचा मर्डर होईल. तुम्हाला भविष्यात नोकरीसाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल,
तेव्हा आम्ही हे सर्टिफिकेट देणार नाही. तुम्हाला कोणीही नोकरी देणार नाही तुमचं करिअर बरबाद होऊन जाईल.
तुमच्या जातीच्या मुली असल्याच असतात, या शब्दात मुलींचा छळ केला.
त्यामुळे अर्थातच या मुलींनी प्रेमा पाटील यांच्यासह इतर पाच ते सहा जणांविरोधात तक्रार दिली.
मात्र एफ आय आर दाखल करून घेण्यास कोथरूड पोलिसांनी असमर्थता दाखवली.
त्यामुळे या मुली इतर काही सहकार्यांबरोबर पुण्यातील पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसल्या.
त्यावेळी तिथे आमदार रोहित पवार, अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर देखील दाखल झाले.
अनेक तास पोलिसांकडे मागण्या करत आपलं म्हणणं मांडूनही एफ आय आर दाखल झालीच नाही.
याउलट पोलिसांनी केलेल्या चौकशीच्या अहवालातून आणि मेडिकल रिपोर्ट मधून या मुलींबरोबर असं काही घडलंच नसल्याचं म्हणण्यात आलं.
या मुलींच्या शरीरावर मारहाणीच्या ताजा जखमाच नाहीत.
आणि पब्लिक व्ह्यू मध्ये कोथरूड पोलीस ठाण्यातील प्रकरण न घडल्यामुळे ॲट्रॉसिटी दाखल होऊ शकत नाही असं थेटपणे पोलिसांनी लिहून दिलं.
आंदोलनाच्या दबावा खाली खोटे गुन्हे दाखल करणार नाही, मुलींनी थेट कोर्टात जावं आम्ही आमची बाजू कोर्टात मांडू, असं चक्क पोलीस आयुक्त म्हणाले.
त्यामुळे या सगळ्याच प्रकरणात आता प्रेमा पाटील आणि मुलींचा छळ करणाऱ्या इतरांविरोधात कोर्टाचं दार ठोठावलं जाणार आहे.
मात्र या प्रकरणामुळे कधीकाळी पीएसआय, एपीआय, मिसेस इंडिया झाल्यानंतर सुप्रसिद्धीच्या झोतात आलेल्या प्रेमा पाटील यांची निगेटिव्ह चर्चा सुरू झाली, हे खरं!