तिकोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार याचा मंगळवारी अपघातात मृत्यू झाला.
मुलाच्या आठवणीत भाऊक होऊन आमदार रहांगडाले यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
आज काळीज फाटलं,
त्यानं आकाश गाठलं;
अविष्कार आमचा हिरा,
होता आनंदाचा झरा;
डॉक्टर नव्हते खमारी गावात,
होती खंत आणि हुरहूर आमच्या मनात;
बापाचे स्वप्न पूर्ण करण्या,
गेला होता अविष्कार डॉक्टर बनण्या;
लागली कुणाची नजर,
आज दगडालाही फुटली पाझर;
गेला तरुण वयात सोडून,
केलेले सारे वादे तोडून;
तुझी आई आजही वाट पाही,
तिला तुझ्या डॉक्टर बनण्याची घाई;
कसे समझवू तिला,
तू परत येणार नाहीस मुला;
कुठे हरवलास पाखरा,
परत ये रे आमच्या लेकरा;
गेलास अविष्कार आम्हाला सोडून,
तुझ्यासाठी रंगविलेले सारे स्वप्न मोडून
आज आहे मातम सगळीकडे,
आई बाबा संगे सारा गाव ही रडे.
अशी भावनिक पोस्ट रहांगडाले यांनी केली आहे