Weather Update

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

901 0

मुंबई : हवामानविभागाकडून (Weather Update) पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामानविभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात पुढील तीन दिवस अनेक भागांत ढगाळ वातावरण राहणार असून, काही भागांत अवकाळी पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट ?
राज्यातील छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा, जालना, ठाणे रायगड आणि नंदूरबार जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News
error: Content is protected !!