PUNE ZP

सात फेब्रुवारीला मतदान; हजारो उमेदवारांची धाकधूक वाढली

49 0

राज्यातील १२ जिल्हा परिषद(JILLA PARISHAD) आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकांसाठी गुरुवारी प्रचाराचा धुरळा शांत झाला. आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. या निवडणुकीत एकूण 7 हजार 438 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या(zp) निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला 5 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 7फेब्रुवारीला निकाल जाहीर करण्याचे नियोजन होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार(AJIT PAWAR) यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. त्यामुळे मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य पदासाठी 2,624 उमेदवार, तर पंचायत समिती सदस्यत्वासाठी 4,814 उमेदवार रिंगणात आहेत. आता मतदारांच्या निर्णयावरच या सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे

Share This News
error: Content is protected !!