Yashomati thakur criticizes Ashok chavan

ASHOK CHAVAN : मतदारांचे मूल्य मटणापुरतं? अशोक चव्हाणांच्या विधानावर काँग्रेसची टीका.

310 0

नांदेड(NANDED) महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप(BJP) नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(ASHOK CHAVAN)यांच्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मतदारांना उद्देशून त्यांनी केलेल्या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

निवडणूक प्रचारात बोलताना अशोक चव्हाण(ASHOK CHAVAN) म्हणाले की, “निवडणुकीच्या काळात सगळेच पक्ष खाऊ-पिऊ घालतात. रोज मटण खा, पण मतदान मात्र कमळालाच करा. एकाचे मटण खाऊन दुसऱ्याला मतदान करू नका. मी मटण देणार नाही, पण भाजपलाच(BJP)मत द्या.” त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

याच भाषणात त्यांनी आपल्याला सोडून गेलेल्या नेत्यांवरही निशाणा साधला. “जे मला सोडून गेले ते राजकारणात बरबाद झाले. एक गेला, दुसरा आला, याचा मला काही फरक पडत नाही. माझ्या नादी कुणी लागू नये,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला.

या वक्तव्यावर काँग्रेस(CONGRESS) नेत्या यशोमती ठाकूर(YASHOMATI THAKUR) यांनी अशोक चव्हाण(ASHOK CHAVAN) यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना ‘आदर्श चव्हाण’ असा टोला लगावला. “काँग्रेसमध्ये असताना ते असे बोलत नव्हते. पक्ष बदलल्यानंतर त्यांची भाषा आणि संस्कृतीही बदलली आहे. मतदारांची किंमत त्यांनी एका मटणापुरती ठेवली आहे,” असा टोला ही त्यांनी लगावला .

 

Share This News
error: Content is protected !!