विटेवर साकारली विठुरायाचे प्रतिमा! नाशिक आणि सोलापूरमधील कलाकारांची कामगिरी

354 0

नाशिकमध्ये एका कलाकाराने आपल्या कलेतून विठ्ठलावर असलेली श्रद्धा व्यक्त केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त येवल्यातील एका व्यंग्यचित्रकार प्रभाकर झळके यांनी विटेवर विठुरायाचे प्रतिमा साकारली आहे. ही प्रतिमा रेखाटण्यासाठी कलाकाराने जल रंगांचा उपयोग करण्यात आला आहे. विठ्ठलाची प्रतिमा विटेवर काढता येईल अशी कल्पना त्यांना अगदी सहज सुचली. बांधकाम सुरू असलेल्या जागी काही विटा पडलेल्या होत्या आणि त्या पाहून त्यांना आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची प्रतिमा विटेवर साकारण्याची कल्पना आली आणि त्यांनी ती सत्यात उतरवली सुद्धा. झळके यांच्या प्रमाणेच सोलापूर येथील एका तरुणाने अशाच प्रकारची कलाकृती निर्माण केली आहे. त्याने सुद्धा विटेवर विठुरायाचे प्रतिमा तयार केली आहे. चित्रकार विपुल मिरजकरने ही प्रतिमा बनवली आहे. अवघ्या दोन तासात विविध रंगाचा वापर करून त्याने ही प्रतिमा बनवली आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर वारी झाली नव्हती त्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी होतीच परंतु यावर्षी मात्र वारकऱ्यांचा उत्साह काहीसा वेगळा आहे. लाखो भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेले आहे. भाविक आपल्या कलेतून विठ्ठलावर असलेलं आपलं प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!