राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आजपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी होणार गाव / प्रभाग भेट

189 0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी गाव / प्रभाग भेटीचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत फेब्रुवारीच्या पहिल्या शनिवारी म्हणजेच आज. ५ फेब्रुवारी रोजी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गाव आणि प्रभागात बैठक आयोजित करावी, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ना. जयंत पाटील यांनी या अनोख्या उपक्रमाची घोषणा केली होती. कार्यकर्त्यांना वैचारिक मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव आणि प्रभागामध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. शनिवारच्या या बैठकीत स्थानिक पदाधिकारी त्यांच्या गावातील किंवा प्रभागातील लोकांसोबत प्रासंगिक विषय, राजकीय बदलांची चर्चा करतील.

 

विचारांची लढाई विचारांनी करायची असेल तर आपल्याला प्रत्येक गावात आपले विचार पोहचवले पाहिजेत, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली होती. त्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्याचा पहिला शनिवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी सर्वांनी आपल्या गावात जाऊन संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

 

Share This News
error: Content is protected !!