UTTRAKHAND HELICOPTER ACCIDENT:अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमानात दुर्घटनेतून अजूनही देश सावरलेला नसतानाच.
उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटना घडली असून यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला.
यामध्ये महाराष्ट्रातील वणी शहरातील जयस्वाल कुटुंबीयांनाही त्यांचे प्राण गमवावे लागले.
UTTRAKHAND HELICOPTER ACCIDENT:उत्तराखंड हेलिकॉप्टर अपघातात वणी शहरातील जयस्वाल कुटुंबाचा मृत्यू
देश अजूनही अहमदाबादच्या विमान अपघाताच्या शोकातून सावरत नाही,
तोच उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड परिसरात एक भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना घडली
केदारनाथहून गुप्तकाशीच्या दिशेने निघालेलं
आर्यन एव्हिएशन कंपनीचं हेलिकॉप्टर रविवारी सकाळी 05:20 मिनिटांनी गौरीकुंडजवळील जंगलात कोसळलं.
KEDARNATH HELICOPTER CRASH: केदारनाथला जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं सोन प्रयागच्या जंगलात
अपघात इतका भीषण होता की हेलिकॉप्टरचा पूर्णपणे कोळसा झाला.
या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून,
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटुंबाचाही यामध्ये समावेश आहे.
कोळसा व्यावसायिक राजकुमार जयस्वाल,
पत्नी श्रद्धा आणि केवळ २३ महिन्यांची चिमुरडी काशी यांचा या अपघातात मृत्यू झाला.
Ahemdabad Plane Crash Update : उड्डाण घेतल्यानंतर ‘त्या’ शेवटच्या काही मिनिटात काय घडलं?
अपघाताचे दृश्य पाहून बचाव पथकही सुन्न झालं होतं.
नेपाळ वंशाच्या महिलांनी जंगलात गवत कापताना अपघात पाहिला आणि
प्रशासनाला तात्काळ माहिती दिली.SDRF आणि NDRF च्या टीम्स घटनास्थळी रवाना झाल्या आहेत,
मात्र दुर्गम जंगलामुळे बचावकार्यात अडथळे येतं आहेत.
हेलिकॉप्टर कोसळण्याचं प्राथमिक कारण खराब हवामान मानलं जात आहे.
सध्या तपास यंत्रणांकडून या अपघाताची चौकशी केली जात आहे..
जयस्वाल कुटुंब वणीतील सुप्रसिद्ध आहे. याच कुटुंबाने जानेवारी २०२४ मध्ये भव्य ‘काशी शिवमहापुराण’ कथेचं आयोजन केलं होतं.
विशेष म्हणजे, या दुर्घटनेतून त्यांचा मुलगा विवान बचावला आहे कारण तो त्या दिवशी आजोबांकडे पांढरकवडा येथे थांबलेला होता.
वणी शहरात या घटनेने शोककळा शोककळा पसरली आहे.
EKNATH SHINDE ON KUNDMELA BRIDGE: कुंडमळा दुर्घटनेनंतर सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार