महापारेषणकडून टॉवर लाईनचे तातडीचे दुरुस्ती काम ; सोमवारी पहाटे दोन तास विमाननगर, नगररोड, येरवड्यामध्ये वीज बंद

306 0

महापारेषण कंपनीच्या खराडी ते थेऊर या १३२ केव्ही अतिउच्च दाब टॉवर लाईनचे तातडीचे दुरुस्ती काम करणे अत्यावश्यक असल्याने नगररोड, विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा या परिसरामध्ये सोमवारी (ता. ११) पहाटे चार ते सहा वाजेदरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे. उन्हाच्या झळा तसेच दैनंदिन कामांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पहाटेच्या सुमारास महापारेषणकडून दोन तासात हे दुरुस्ती काम पूर्ण करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या खराडी ते थेऊर अतिउच्च दाब उपकेंद्रादरम्यान टॉवर लाईनचे जम्प बदलण्याचे काम प्रस्तावित आहे. हे काम तातडीचे व अत्यावश्यक असल्याने पूर्वनियोजन करून सोमवारी (ता. ११) पहाटे दोन तासांत ते पूर्ण करण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे खराडी अतिउच्च दाब उपकेंद्रातून होणाऱ्या महावितरणच्या २२ केव्ही १९ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणकडून १९ पैकी ११ वाहिन्यांचा वीजपुरवठा महापारेषणच्या मगरपट्टा, थेऊर, व्हीएसएनएल या अतिउच्च दाब उपकेंद्राद्वारे पर्यायी स्वरुपात सुरु ठेवण्यात येणार आहे. तथापि विजेचे भार व्यवस्थापन शक्य होत नसल्याने उर्वरित ८ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा पहाटे दोन तास नाईलाजाने बंद ठेवावा लागणार आहे.

त्यामुळे सोमवारी (ता. ११) पहाटे ४ ते ६ वाजेदरम्यान या ८ वीजवाहिन्यांवरील गांधीनगर, यशवंतनगर, गणेशनगर, जयप्रकाशनगर, लक्ष्मीनगर, भाटनगर, सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा गाव, रामनगर, महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी, पीडब्लूडी वसाहत, त्रिदलनगर, नागपूर चाळ, सह्याद्री हॉस्पीटल परिसर, विमानगर, रोहन मिथीला सोसायटी, साकोरेनगर, राजीवनगर नॉर्थ व साऊथ, गणपती मंदिर चौक, दत्त मंदिर चौक, श्रीकृष्ण हॉटेल, फिनिक्स चौक, श्रीरामनगर, पारेशरनगर, फॉरेस्ट पार्क, खुळेवाडी, खांदवेनगर, विमानतळ रोड, रामवाडी गावठाण, चंदननगर, संघर्ष चौक, प्रितनगर, अष्टविनायक नगर, पद्मय्या सोसायटी, बोराटेवस्ती, यशवंतनगर, तुकारामनगर, गणपती हाऊसिंग सोसायटी, शेजवळ पार्क, साई पार्क, वृंदावन कॉलनी, म्हाडा कॉलनी या परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे. या परिसरातील वीजग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर या संदर्भात ‘एसएमएस’द्वारे माहिती देण्यात येत आहे.

Share This News

Related Post

Gondia Crime

Gondia Crime : अवघ्या 60 रुपयांसाठी मित्रानेच केला मित्राचा घात; गोंदिया हादरलं…

Posted by - October 9, 2023 0
गोंदिया : माणूस एखाद्या शुल्लक गोष्टीचा राग मनात धरून कधी काय करेल याचा काही नेम नाही. याचाच प्रत्यय या प्रकरणात…
Nilesh Majhire

Nilesh Majhire : निलेश माझीरे राष्ट्रवादी दादा गटाच्या वाटेवर? शेकडो समर्थकांसह आज घेणार अजित पवारांची भेट

Posted by - July 6, 2023 0
पुणे : शिवसेना शिंदे गटाच्या माथाडी सेनेचे जिल्हाध्यक्ष असणारे निलेश माझीरे (Nilesh Majhire) राष्ट्रवादी दादा गटाच्या वाटेवर असून आज शेकडो…
Dhule Accident

Dhule Accident: रस्त्यातील वाहनांना उडवून हॉटेलमधील लोकांना चिरडलं; धुळे अपघाताचे CCTV आले समोर

Posted by - July 4, 2023 0
धुळे : राज्यात सध्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर (Dhule Accident) शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ एक भीषण अपघात झाला.…

सावरकरांचा उल्लेख करत अरविंद केजरीवालांची मोदी सरकारवर टीका; म्हणाले, “इंग्रजांची माफी…”

Posted by - July 23, 2022 0
दिल्ली : माफियांना आश्रय दिल्याचा आरोप सक्सेना यांनी केला आहे. तसेच दिल्ली सरकारच्या वादग्रस्त नवीन उत्पादन शुल्क धोरणाबाबत सीबीआय चौकशी…
Navi Mumbai

Navi Mumbai : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यामुळे आक्रमक होऊन ट्रकचालकांनी पोलिसांना केली मारहाण

Posted by - January 1, 2024 0
नवी मुंबई : केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटार वाहन कायद्याला देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. महाराष्ट्रातही (Navi Mumbai)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *