Truck Drivers Strike

Truck Drivers Strike : पेट्रोल-डिझेल टँकर चालकांचा संप अखेर मागे; पोलीस बंदोबस्तात टँकर होणार रवाना

696 0

नाशिक : केंद्र सरकारने नुकताच पारित केलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक, टँकर चालकांनी नवीन वर्षापासून संप (Truck Drivers Strike) पुकारला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांना होणार इंधन पुरवठा विस्कळीत झाला. यामुळे मनमाड डेपोतून इंधनाचे टँकर निघावे, यासाठी सातत्याने दोन दिवसांपासून बैठका सुरु होत्या. अखेर या हालचालींना यश आले आहे.

मंगळवारी मनमाड येथे जिल्हाधिकारींनी टँकर चालक, मालक यांची बैठक घेतली. त्यात तोडगा निघाला आहे. यामुळे केंद्र शासनाने आणलेल्या नवीन वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक, टँकर चालकांनी देशव्यापी संप सुरु केला आहे. या संपात महाराष्ट्रातील ट्रक आणि टँकर चालक सहभागी झाले आहेत. यामुळे राज्यातील पेट्रोल पंपांना होणार इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. मनमाड येथील एचपीसीएल, बीपीसीएल, इंडीयन ऑईल आणि गॅस प्लँटमधून गरज पडल्यास बंदोबस्तात टँकर रवाना होणार आहे.

सर्वांना इंधन मिळणार, साठा करु नका
मनमाड डेपोतून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरवठा होतो. आता संप मागे घेतला गेला आहे. यामुळे इंधन पुरवठा सुरळीत होणार आहे. लोकांनी जास्त घाई करू नये. सर्वांना इंधन उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे बनला मुंबईचा कर्णधार! ‘या’ खेळाडूला संघातून वगळले

Pandharpur News : मुलाच्या हळदीत नाचताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू; मृत्यूचे कारण ऐकून बसेल धक्का

Weather Update : राज्यात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Ajit Pawar : लातूर-बार्शी-टेंभूर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Pune News : पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ 1 कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त

Chhatrapati Sambhajinagar : छ. संभाजीनगरातील 6 कामगारांचा जळून मृत्यू झालेल्या कंपनीबाबत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Truck Driver Strike : आंदोलनाचा इंधन पुरवठ्याला मोठा फटका

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!