हीच वाढदिवसाची अनमोल भेट ठरेल…; सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना केलं ‘हे’ आवाहन

493 0

मुंबई: राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुळे यांनी हितचिंतक, कार्यकर्ते यांना एक आवाहन केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वच सदस्यांना माझ्याप्रती असणारा जिव्हाळा व आस्था नेहमीच व्यक्त होत असते. उद्या माझ्या वाढदिवसानिमित्तही अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व शुभचिंतक प्रत्यक्ष भेटून आपल्या शुभेच्छा मला देण्यासाठी उत्सुक आहेत याची मला जाणीव आहे. आपणां सर्वांना मी एकच नम्र आवाहन करू इच्छिते की शुभेच्छूकांनी फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तके, शालेय वस्तू, रेनकोट, भेटवस्तू आदींचे वाटप करावे.

या सामाजिक उपक्रमाचे फोटो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करावेत, मी ते माझ्या सोशल मीडिया माध्यमांवर शेअर करेन. आपला पक्ष हा नेहमीच आपली समाजाप्रतीची बांधिलकी जपत आला आहे. आपण हा गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा उपक्रमही नेहमीच्याच तत्परतेने राबवावा, माझ्यासाठी वाढदिवसाची हीच अनमोल भेट ठरेल असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!