राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (AJIT PAWAR) यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या अचानक निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार(SUNETRA PAWAR)यांनी पुढे यावे, अशी मागणी होत असून, त्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर्गत बैठक होणार असून, त्यानंतर सायंकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार(SUNETRA PAWAR) यांनी शरद पवार(SHARAD PAWAR) यांच्याशी कोणतीही चर्चा न करता मुंबई(MUMBAI) गाठल्याचे सांगितले जात आहे. त्या रात्री उशिरा मुलगा पार्थ पवार(PARTH PAWAR) यांच्यासह मुंबईतील देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या.
याच पार्श्वभूमीवर शरद पवार(SHARAD PAWAR) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सुनेत्रा पवार (SUNETRA PAWAR) यांच्याशी यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही, तसेच आज शपथविधी होणार आहे, याचीही त्यांना माहिती नाही. सुनेत्रा पवार(SUNETRA PAWAR)यांचा संभाव्य शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केले.