ajit dada funeral

‘दादा’पर्व अनंतात विलीन! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

51 0

राज्याच्या राजकारणातील एक अष्टपैलू नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचे लाडके ‘दादा'(DADA) अर्थात अजित पवार(AJIT PAWAR) आज अनंतात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र पार्थ पवार (PARTH PAWAR)आणि जय पवार(JAY PAWAR) यांनी आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला. या घटने संपूर्ण बारामती (BARAMATI) शोककळा पसरली आहे.

सकाळपासूनच अजितदादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आपल्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून जनसागर लोटला होता. “अजितदादा(AJIT DADA) परत या”, “दादा (DADA)आम्ही तुम्हाला विसरणार नाही” अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय नेते यावेळी उपस्थित होते.

प्रशासनावर असलेली पोलादी पकड, कामाचा धडाका आणि स्पष्टवक्तेपणा ही अजितदादांची (AJIT DADA)ओळख होती. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. बारामतीचा(BARAMATI) ‘विकासपुरुष’ आज कायमचा शांत झाला असून, त्यांच्या आठवणींच्या रूपाने ते महाराष्ट्राच्या मनात जिवंत राहतील अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Share This News
error: Content is protected !!