pankaja munde helicoptar

पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; मोठा अनर्थ टळला

73 0

भाजप (BJP)नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे(PANKAJA MUNDE) यांच्या हेलिकॉप्टरमध्ये (HELICOPTER)आज तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर(CHATRAPATI SAMBHAJINAGAR) येथून लातूरकडे उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना वैमानिकाच्या लक्षात हा बिघाड आला. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले आणि संभाव्य धोका टळला.

पंकजा मुंडे (PANKAJA MUNDE)या सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाडा दौऱ्यावर असून, आज लातूर(LATUAR) जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांसाठी त्या छत्रपती संभाजीनगर(CHATRAPATI SAMBHAJINAGAR) विमानतळावरून हेलिकॉप्टरने लातूरकडे रवाना होणार होत्या.

हेलिकॉप्टर (HELICOPTER)उड्डाणासाठी सज्ज असतानाच तांत्रिक अडचण आढळून आल्याने उड्डाण थांबवण्यात आले. या घटनेमुळे लातूरमधील नियोजित प्रचारसभांच्या वेळापत्रकात बदल करावा लागला आहे.

दरम्यान, कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून, पंकजा मुंडे(PANKAJA MUNDE) या लवकरच लातूरकडे (LATUR)रवाना होणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. काही प्रमाणात विलंब झाला असला तरी त्या सर्व नियोजित सभांना उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पंकजा मुंडे(PANKAJA MUNDE) सुरक्षित असल्याचे समजताच समर्थक आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे

Share This News
error: Content is protected !!